आ.गुट्टे यांच्या प्रयत्नाने मध्यांन्ह भोजनाची ग्रामीण भागात ही सुरुवात

29

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.30एप्रिल):-तहानलेल्यास पाणी द्यावे, भुकेल्यास अन्न द्यावे ही आपली भारतीय संस्कृती आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गरजवंतास मदत करण्यासारखे दुसरे पुण्य नाही असे सांगण्यात आले आहे. त्याच धर्तीवर सध्या राज्यांमध्ये सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबविल्या जात आहेत. त्यातीलच एक म्हणजे राज्यातील कामगार लोकांना एक वेळच्या भोजनाची योजना राबविण्यात येत आहे.

दि. ३० एप्रिल २०२२ रोजी गंगाखेड तालुक्यातील रूमणा जवळा येथे आमदार रत्नाकर गुट्टे (काका) मित्रमंडळाचे विधानसभा अध्यक्ष कृष्णाजी सोळंके यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की अधिकाधिक कामगारांनी आपली नोंदणी करून जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा.
काही दिवसांपूर्वीच गंगाखेड शहरात कामगार लोकांसाठी मध्यान्ह भोजनाचा शुभारंभ आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते पार पडला असून शहरातील कामगारांना मध्यान्ह (एक वेळेचे) भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून ग्रामीण भागातही याची सुरुवात करण्यात आली असून ग्रामीण कामगारांनाही याचा निश्चित लाभ होणार आहे.

शहरासह तालुक्यातील नोंदणीकृत व अनोंदणीकृत कामगार आहेत त्यांची एक वेळच्या जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. ज्या कामगारांना काम करताना जेवणाची व्यवस्था होत नाही त्या कामगारांना या योजनेचा फायदा होणार आहे.
ही योजना आमदार गुट्टे यांच्या प्रयत्नाने गंगाखेड शहरासह हळूहळू तालुक्यात ही सुरुवात होत आहे. त्याची सुरुवात रूमणा जवळा पासून झाली आहे.यावेळी उपस्थित शासकीय योजन मदत केंद्र समन्वयक,अभिजीत चक्के, संजय सोपान सोळंके रामभाऊ मानवतकर माजी सरपंच शिवाजी गिरी राहुल सोळंके हनुमान सोळंके रामभाऊ रोहीलवाढ गोविंद सोळंके गोविंद पोळ लक्ष्मण सोळंके विनायक सोळंके मुरलीधर सूर्यवंशी सैलानी शेख बंदे नवाज शेख रामेश्वर नरवाडे माधव सोळंके केशवराव सोळंके तसेच रूमणा गावकरी मंडळी या कार्यक्रमास उपस्थित होते