गंगाबाई तलमले महाविद्यालयात वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती साजरी

27

 

ब्रम्हपुरी :- स्थानिक गंगाबाई तलमले महाविद्यालयात वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम प्रा. ओमादेवी बुराडे यांचा हस्ते राष्ट्रसंत तीक्दोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मंगेश देवढगले होते. या प्रसंगी बोलतांना प्रा. लालाजी मैंद म्हणाले कि, चीनच्या युद्धाच्या वेळेस सैनिकांना प्रोत्साहन देण्याचे कार्य भजनाच्या माध्यमातून नखनांना उद्देशून ‘झाला गर्क कसा व्यसनांत उठारे उठ तरुणात दे हात’ हा भजन म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये एक मोलाचा संदेश दिला. तर अध्यक्षीय भाषणात प्राचार्य मंगेश देवढगले म्हणाले कि, बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेल्या ग्रामगीतेचे महत्व या प्रसंगी विषद केले. यांच्या जयंती दिनी मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. या कार्यक्रमाला सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. अश्विनी बोरकुटे, प्रा. ओमादेवी बुराडे, प्रा. कविता भागडकर, प्रा. डिंपल तलमले, प्रा. तृप्ती नागदेवते, श्री. उमेश राउत, श्री. अनिल प्रधान, श्री. कनक ठोंबरे आदि उपस्थित होते. राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.