श्रीक्षेत्र सुदर्शन आश्रम शिंदेवाडी येथे सोमवारी ह. भ. प. श्रीधर महाराज शिंदे यांचे होणार काल्याचे किर्तन

    88

    ✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

    आष्टी(दि.1मे):-श्रीक्षेत्र सुदर्शन आश्रम शिंदेवाडी येथे दि. २५ एप्रिल पासून चालू असलेला तृतीय वर्धापन दिन सप्ताहची सांगता दि. २ मे सोमवारी महंत ह. भ. प. गुरुवर्य श्रीधर महाराज शिंदे यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. तत्पूर्वी सात दिवस या ठिकाणी भागवत कथा तसेच संत तुकोबाराय जीवन चरित्र आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तने झाली.

    तरी यावेळी माणिकदौंडी परिसर, जाटदेवळा परिसर, धामणगाव परिसर, नागतळा परिसर, आष्टी तालुका व पाथर्डी तालुक्यातील भाविक सात दिवस मोठ्या प्रमाणे उपस्थित होते. तरी काल्याचे किर्तनाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांकडून करण्यात येत आहे.