राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे उत्साहात साजरी

    41

    ✒️वरोरा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

    वरोरा(दि.1मे):- दिनांक 30 एप्रिल ला तुकडोजी महाराजांची जयंती कार्यक्रमासाठी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ राठोड यांच्या अध्यक्षतेखाली सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.पूजन व माल्यर्पन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका उपजिल्हा रुग्णालय वरोरा यांनी प्रास्ताविक केले राष्ट्र संत तुकडोजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकला आणि सर्वांना त्यांच्या कार्याला हातभार लावावा आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यात यावा असे आवाहन केले.

    साफसफाई , स्वच्छता, यावर भर देण्यात यावा असे अध्यक्षीय भाषणात डॉ राठोड वैद्यकीय अधीक्षक यांनी मार्गदर्शन केले.सौ मिना मोगरे यांनी आभारप्रदर्शन केले या कार्यक्रमाला श्री मडावी, मीना मोगरे अधीपरीचारिका पपीता यांनी मेहनत घेतली.सौ कूमरे परीसेवीका , सर्व अधीपरीचारीका कक्षसेविका सफाई कामगार व कर्मचारी उपस्थित होते.राष्ट्रवंदनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.