मनमाड येथे बहिणीकडून सख्ख्या भावाचा चाकूने भोसकुन खून

    44

    ✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

    नाशिक(दि.1मे):–नादगाव तालुक्यातील मनमाड शहरातील विवेकानंदनगर नंबर २ मधील एका बहिणीने आपल्या सख्या भावाचा चाकू मारून खून केल्याची नुकतीच धक्कादायक घटना घडली असून या प्रकाराने शहरात एकच खळबळ उडाली आहे . भावाला मारून महिला स्वतःच पोलिस ठाण्यात हजर झाली घटनेच गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व प्रेत ताब्यात घेऊन उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवले याबाबत शहर पोलिस यांचे उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते . मनमाड शहरातील विवेकानंदनगर नंबर २ भागात राहणाऱ्या संदीप उर्फ बाळू गोंधे या ४५ वर्षीय व्यक्तीची ५५ वर्षीय बहीण नामे शोभा १५ एप्रिल रोजी राहण्यासाठी आली होती .

    बहिणीची जवान मुलगी कोरोना काळात मयत झाल्याने दुःखी असलेली बहीण आईकडे निवांत राहण्यासाठी आली होती मात्र बाळू हा आपल्या बहिणीला कायम दारू पिऊन त्रास देत होता व चिडवत होता आज सकाळी त्याने बहिणीला जाडी म्हणून चिडवले याचा राग येऊन शोभाने किचनमधील चाकूने बाळूवर वार केला तो वार वर्मी व बरोबर छातीच्या मधोमध लागला व यात त्याच्या लिव्हरला दुखापत होऊन तो रक्ताच्या थारोळ्यात पडला अतिरक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला ही घटना घडल्या नंतर शोभा ही स्वतःच पोलिस ठाण्यात येऊन जमा झाली व घडलेला प्रकार सांगितला . घटनेचे गांभीर्य ओळखून सहायक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व पाहणी करून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मनमाड उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला . या घटनेची माहिती मिळताच मनमाड उपविभागीय पोलीस अधीक्षक समिरीसिंह साळवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पुढील कारवाईचे आदेश दिले . या घटनेची माहिती शहरात वार्यासारखी पसरली व यामुळे एकच खळबळ उडाली