


🔸वो बात करो पैदा तुम अपनी जुबानोमे ! दुनिया भी कहे कुछ है ! कुछ बात हैं भीम दिवानोमे!!
🔹अंबाजोगाई पिपल्स बँकेच्या वतीने रंगला नवयान महाजलसा
✒️अंबाजोगाई प्रतिनिधी(शेख फिरोज)मो:-7020475287
अंबाजोगाई(दि.1मे):- तथागत भगवान गौतम बुद्धांनी सुमारे २५०० वर्षापूर्वीचआपल्या आंतरमनाची सेल्फी काढण्याची शिकवण संपूर्ण जगाला दिली होती असा स्पष्ट निर्वाळा विद्रोही शाहिरां शीतलताई साठे यांनी दिला. त्या आज अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर , क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने तसेच अंबाजोगाई पिपल्स बँकेच्या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्ताने आयोजित विद्रोही नवयान महाजलसा या समाजप्रबोधन पर कार्यक्रमात बोलत होत्या .यावेळी त्यांच्या सोबत विद्रोही कवी सचिन माळी हे देखील उपस्थित होते .
नवयान महाजलसाया कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून व डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमाचे पूजन करण्यात आले .याप्रसंगी व्यासपीठावर अंबाजोगाई पिपल्स बँकेचे अध्यक्ष राजकिशोर मोदी , माजी आमदार पृथ्वीराज साठे , बँकेचे उपाध्यक्ष प्रकाश सोळंकी , पणन महासंघाचे ऍड विष्णुपंत सोळंके , संचालक प्रा वसंत चव्हाण , पुषोत्तम चोकडा ,दिनकर जोशी , मनोज लखेरा ,महादेव आदमाने , कचरू सारडा , गणेश मसने , सुनील वाघळकर, धम्मा सरवदे , संतोष शिनगारे , सुनील व्यवहारे आदींची उपस्थिती होती .
कार्यक्रमाचे प्रास्तविक ऍड विष्णुपंत सोळंके यांनी केले .तर राजकिशोर मोदी यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की अंबाजोगाई शहर हे चळवळीचे शहर आहे .तर येथील नागरिक चळवळीला पाठींबा देणारे असे आहेत . ज्यावेळी कवी सचिन माळी व शितलताई साठे या संकटात होत्या त्यावेळी त्यांच्या पाठीशी अंबाजोगाई येथील चळवळीतील सर्व युवक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते . मात्र अशा ही संकटाच्या प्रसंगी शितलताई साठे या रडत बसल्या नाहीत तर खंबीरपणे लढा देण्यासाठी उभ्या होत्या असे गौरवोद्गार राजकिशोर मोदी यांनी काढले . देशातील महामानवांनी देशाला स्वातंत्र्य , समता व बंधुभाव देण्याचे काम केले .त्यांचाच वसा आज सचिन माळी व शितलताई साठे या चालवत असल्याचे अभिमानाने मोदी यांनी सांगितले .
विद्रोही शाहिरा शितलताई साठे यांनी आपल्या शाहिरीतून उपस्थित जनसमुदायास प्रबोधन केले.आपल्या शाहिरीतून त्यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी सुमारे २५००वर्षापूर्वीच आपल्या आंतरमनाची शुद्धी करण्यासाठीचा उपाय सांगितल्याचे म्हणाल्या .शितलताई साठे यांनी वामनदादा कर्डक यांचा पाण्यासाठीचा संघर्ष मय पोवाडा “पाणी वाड ग माय , पाणी वाड ग माय” सादर केला .त्याकाळी पिण्याच्या पाण्यासाठी मरणयातना सहन कराव्या लागल्या.डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या तळ्याचे पाणी दलितांच्या साठी खुले केले त्यावरही महाडच्या तळ्याच पाणी पेटलं ग बाई , त्या तळ्यात माझ्या भिमाची छबी भेटलं ग बाई” असाही पोवाडा सादर करून बाबासाहेबांच्या उपकाराची जाणीव करून दिली .व त्यामुळेच बाबासाहेबाना लोक देवापेक्षाही मोठे मानण्यात मागेपुढे पहात नसल्याचे सांगितले .
सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर देखील त्यांनी प्रकाश टाकला .ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी आपले आयुष्य वेचले .संत गाडगेबाबा यांनी माणसाच्या मनातील घाण दूर करण्याचे काम केले.लहुजी साळवे यांना त्या काळचे शिक्षण महर्षी म्हणावे लागेल .लहुजींची पुतणी सावित्रीबाई च्या शाळेत शिक्षिका म्हणून काम करीत होत्या .म्हणून लहुजींचे कार्य देखील इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले पाहिजे असे शितलताई साठे यांनी सांगितले.या नवयान महाजलस्यात हजारो नागरीकांनी हजेरी लावली. या कार्यक्रमाचे संचलन महादेव आदमाने , विजय रापतवार, तसेच अनंत कांबळे यांनी केले .महाजलसा कार्यक्रमाची सांगता संविधान वाचन करून राष्ट्रगीताने करण्यात आली .




