धुळगाव जिल्हा परिषद शाळा मध्ये डिजीटल वर्ग सुरू व शालेय पोषण आहार वाटप

    32

    ✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी येवला)मो:-९६०४१६२७४०

    येवला(दि.1मे):- आज दिनांक २७ या रोजी येवला तालुका जिल्हा परिषद शाळा धुळगाव येथील इयत्ता पहिली ते इयत्ता सातवी च्या वर्गातील विद्यार्थ्यांना शासनाच्या आदेशानुसार शाळेतील मुलांना पोषण आहार वाटप करण्यात आले तसेच मागील काळात प्राथमिक शाळा धुळगाव या शाळेला गावातील ग्रामस्थांनी आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी या या शाळेला डिजिटल शाळा व्हावे म्हणून शासनाला निवेदन देण्यात आले होत.

    ते मंजूर करून आज या धुळगाव मध्ये शाळेला कलर देऊन आकर्षक चित्रीकरण करून धुळगाव शाळेचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिजिटल असे प्रत्येक नागरिकाच्या मुखातून ऐकण्यात येत आहेत आणि सर्वात महत्वाच म्हणजे शिक्षक आणि शिक्षिका आपल्या विद्यार्थ्यांना वेळोवेळी त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष देऊन आपल्या जबाबदारी पार पाडत आहेत म्हणून धुळगावच्या ग्रामस्थांचे आणि शिक्षकांची शिक्षकांचे जितके कौतुक करावे तितके कमीच आहेत. संतोष गायकवाड यांनी सर्व शिक्षक कर्मचारी व पालक यांचे आभार मानले