🔹पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांना निवेदन सादर

✒️चिमूर( पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर (29 जून)- चिमूर तालुक्यातील मदनापूर येथे असलेले ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे प्रवेश द्वार पार्टकांसाठी खुले करू नये ,अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
मदनापूर ग्राम पंचायतचे सरपंच देवनाथ रंदये यांनी गावकऱ्यांच्या वतीने पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांना निवेदन सादर केले, या निवेदनानुसार,ग्राम पंचायत मदनापूर अंतर्गत मौजा मदनापूर येथे ताडोबा-अंधारी प्रकल्पाचे प्रवेशद्वार आहे.
सदर प्रवेशद्वार दि.1जुलै पासुन सुरु करण्याबाबत प्रशासकीय यंत्रणा हालचाली करीत आहे,कोरोना महामामारी चे संकट पुढे असतांना प्रवेशद्वार सुरु करणे सयुक्तिक नसल्याचे मत गावकऱ्यांचे आहे.गावकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे,
राज्यात कोरोना रुग्ण वाढत आहेत, त्यामुळे कोरोना विषाणू चा पादुर्भाव कमी होईपर्यंत गेट सुरु करू नये, अन्यथा गावकऱ्यां आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल, असा उल्लेख निवेदनात आहे.

Breaking News

©️ALL RIGHT RESERVED