राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षकाने सेवानिव्रृत्तीच्या दिवशी सुद्धा केले नवोदय परीक्षेचे सुपरव्हिजन

52

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगांव(दि.1मे): – जि.प.उच्च प्राथमिक शाळा धरणगाव येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक पंढरीनाथ गिरधर पाटील हे ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त होणार होते परंतु त्या दिवशी नवोदय परीक्षा देखील होती परंतु त्यांनी सेवानिवृत्तीच्या दिवशी इंदिरा कन्या शाळेत जवाहर नवोदय परीक्षेचे सुपर विजनचे काम करून शिक्षकाची उपक्रमशीलता, कर्तव्यावरील निष्ठा, जगण्यातील निस्पृहता, आणि निस्वार्थ वृत्ती, विद्यार्थ्यांनाप्रती असणारे प्रेम, वंचित, शोषित, पिडीत, अनाथ विद्यार्थ्यांना नेहमी आसरा देणाऱ्या शिक्षकांना शेवटच्या श्वासापर्यंत कार्य करावेसे वाटते असे दाखवून दिले.

त्यांचा नवोदय विद्यालयचे प्रतिनिधी दिनेश गायकवाड यांच्या हस्ते सेवापुर्ती निमित्ताने सत्कार करण्यात आला कार्यक्रमास केंद्रप्रमुख मनाेहर पवार , केंद्रप्रमुख प्रमोद पाटील , ग्रेडेड मुख्याध्यापक राजेंद्र गायकवाड, कैलास पवार दिलीप बाविस्कर, गोपाल विसावे, प्रवीण सूर्यवंशी, सुरेंद्र सोनवणे,छोटू धनगर, उपस्थित होते सूत्रसंचालन कैलास पवार यांनी केले. कार्यक्रमास शिक्षक-शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.