ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी

27

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि.30 एप्रिल):- डॉ. पंजाबराव देशमुख कन्या कनिष्ठ महाविद्यालय तथा डॉ. पंजाबराव देशमुख कॉन्व्हेंट ब्रह्मपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. प्रकाशभाऊ बगमारे तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तथा कॉन्व्हेंटच्या प्राचार्या मनिषाताई बगमारे ,प्रा. कु. एच .के.बगमारे ,गोवर्धन दोनाडकर, नीलिमा गुज्जेवार, निशा ठाकरे ,लोभा घोरमोडे,अश्विता सयाम,प्रगती शेंडे,वैशाली सोनकुसरे,अंकुश ठाकरे, कामिनी कन्नमवार, घर्षना सेलोकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कीर्तन व खंजिरी भजने यांच्या माध्यमातून समाजसेवा करण्याचे ध्येय बाळगून अंधश्रद्धा व राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रबोधन करणारे ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीपप्रज्वलन करून अभिवादन केले. 30 एप्रिल वंदनीय राष्ट्संताच्या जन्मदिवस म्हणजे ग्रामजयंती माझ्या जन्मदिनी विश्वातील प्रत्येक गाव संपूर्ण स्वच्छ सौंदर्यवान व सर्व सुखसोयी परिपूर्ण व्हावे तसेच प्रत्येक व्यक्ती आचार विचाराने समृद्ध झाली पाहिजेत असे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची अपेक्षा होती . सध्यातरी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा का महाराज होणे अशक्य आहे.असे मत आपल्या मनोगतातून शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. प्रकाशभाऊ बगमारे यांनी व्यक्त केले. व उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. संचालन व आभार प्रा. एच.के.बगमारे यांनी केले.