सुवर्ण महोत्सवी शाळेत महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील सर)

धरणगाव(दि.1मे):- धरणगाव शहरातील सुवर्णमहोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेत आज एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सर्वप्रथम सुवर्णमहोत्सवी शाळेचे लिपिक जे.एस.महाजन भाऊसाहेब यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यानंतर सांस्कृतिक विभाग प्रमुख एस.एन.कोळी यांनी जल सुरक्षा संदर्भात सामूहिक प्रतिज्ञेचे वाचन केले.याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार, पर्यवेक्षक एम.बी.मोरे, ज्येष्ठ शिक्षिका पी.आर.सोनवणे, एम.के.कापडणे तसेच शाळेतील सर्व सन्माननीय शिक्षक बंधू-भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED