आमदार देवेंद्र भुयार यांच्या माध्यमातून ७ रुग्ण उपचारासाठी मुंबईला रवाना !

70

✒️मोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मोर्शी(दि1मे):-मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी तालुक्यामध्ये भव्य आरोग्य तपासणी महायज्ञ शिबिराचे आयोजन करून आरोग्य महायज्ञ शिबिरामध्ये विविध व्याधींनी त्रस्त असलेल्या हजारो रुग्णांची तपासणी करण्यात आली.ईच्छा शक्ती असेल तर एखादा लोकप्रतिनिधी रुग्णसेवा करून शेकडो रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करून मदत करून सामान्य माणसांना दिलासा मिळवून देण्यासाठी सामान्य माणसापर्यंत कसा पोहचू शकतो याचे आदर्श उदाहरण ठरत असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी रुग्णसेवेच्या माध्यमातून दाखवून दिले आहे.आमदार देवेंद्र भुयार यांनी राबविलेल्या आरोग्य महायज्ञ शिबिराच्या माध्यमातून ७ रुग्णांना सर्जरीसाठी व उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात रवाना करण्यात आले.

आरोग्य महायज्ञ शिबिरा अंतर्गत, आमदार देवेंद्र भुयार यांच्या माध्यमातून शेकडो रुग्णांची व बालकांची निःशुल्क शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी सांगितले.
मोर्शी येथे आरोग्य महायज्ञ शिबिरात कॅन्सर, विविध गाठीची शस्त्रक्रिया, बालरोग, हृदयरुग्ण, अस्थीरोग, हायड्रोसिल, डोळ्यांची शस्त्रक्रिया, यासह विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या शेकडी रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे आढळले असून त्यांच्यावर निःशुल्क मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असून आज मोर्शी येथून भावेश सोनूले, प्रतीक उईके, आदिवेक विंचूरकर, निशा लिखितकर, निलेश शिंगारे, श्रद्धा गुडधे, माधुरी काळे, या रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी मुंबई येथे पाठविण्यात आले असून उर्वरित रुग्णांना टप्प्याटप्प्याने मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितले. या उपक्रमासाठी आमदार देवेंद्र भुयार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष नरेंद्र जिचकार, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष अंकुश घारड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके, मोहन मडघे, डॉ प्रदीप कुऱ्हाडे, रोशन दरोकर, रुग्णसेवक राधेश्याम पैठणकर, शेर खान नन्हे खान, पप्पू खान, घनश्याम कळंबे, हितेश साबळे, वैभव फुके, रोहित नागले, यांच्यासह आदी मंडळींनी विशेष परिश्रम घेतले.