छ. शिवरायांची समाधी राष्ट्रपिता म. फुले यांनीच शोधली.:- पॅन्थर डॉ. राजन माकणीकर

✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मुंबई(दि.1मे):-छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी राष्ट्रपिता महात्मा क्रांतिबा ज्योतीराव फुले यांनी शोधून काढली हा खरा इतिहास आहे. कोणी भटमान्यांनी नाही. अशी माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव पॅन्थर् डॉ. राजन माकणीकर यांनी दिली आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील जाहीर सभेत छत्रपती शिवरायांची समाधी लोकमान्य टिळकांनी शोधली असल्याचे वक्तवे केले, “त्या” वक्तव्याचे खंडन करत असल्याचे सांगून ते वक्तवे चुकीचे आहे, इतिहासात भेसळ करण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत आहेत. रिपब्लिकन् पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक त्यांच्या या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत असल्याचे डॉ. माकणीकर म्हणाले.

रायगडावरील भग्नावस्थेतील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले यांनी जगासमोर आणून दिली आहे हे सत्य आहे. महात्मा जोतिबा फुले यांनी छ. शिवरायांवर आधुनिक युगातला पहिला पोवाडा लिहीला आणी शिवजयंती ची सुरुवात ही त्यांनीच केली. यामुळे शिवसमाधी चा आणी बाळगंगाधर टिळकांचा काडीचाही संबंध नसल्याचे पॅन्थर् माकणीकर यांनी सांगितले.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED