नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई: परराज्यात दरोडे टाकणारी टोळी गजाआड

49

✒️नाशिक,विभागीय प्रतिनिधी(विजय केदारे)

नासिक(दि.1मे):-महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी बजावली आहे दरोड्याच्या तयारीत असलेली मोठी टोळी पोलिसांनी गजाआड केली आहे यासंदर्भात पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली आहे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी परिषदेला माहिती दिली की एक मोठी टोळी दरोड्याच्या तयारीत होती यासंदर्भात पोलिसांनी काही माहिती मिळाली त्यानंतर स्थानिक गुन्हे शोध पथकाने सापळा रचला त्यात ही टोळी सापडली आहे या टोळीतील सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून तब्बल 12लाख 79 हजार 860 रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

तसेच त्यांच्याकडून पेपर स्प्रे नायलॉन दोरी लोखंडी रोड जप्त करण्यात आला आहे सोनेरी रंगाची बिस्कीट13 मोबाईल असा 3लाख18 हजार रुपयाचा ऐवजी पोलिसांनी या टोळीकडून जप्त केला आहे गुजरातमधून या संशयितांनी दरोडा घातल्याचा समजत आहेवनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शोध पथकाने यशस्वी कारवाई केली आहे सोन्याची बिस्किटे विक्री करण्याच्या बहाण्याने अनेकांना या टोळीने लुटले आहे जयप्रकाश मेहेर, रमेश पवार, वसंत पवार ,संपत मुंडा ,लक्ष्मण कोल्हे ,कमलाकर गांगुर्डे, शिवदत्त विश्वकर्मा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत या टोळीचा मुख्य संशयित जयप्रकाश मेहेर आहे त्यांच्याविरोधात परराज्यात गुन्हे दाखल असल्याची बाब ग्रामीण पोलिसांच्या निदर्शनास आली या टोळीची कसून चौकशी केली जात असून अनेक गंभीर गुन्हे उघडकीस येण्याची चिन्हे दिसत आहे