पुसद येथे वंचित बहुजन आघाडीचा शांतता मार्च संपन्न

49

🔹कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शांतता मार्च फेरीचे आयोजन!

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.1मे):- -महाराष्ट्र दिनी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा तथा अध्यक्ष बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी, संपूर्ण महाराष्ट्रात शांतता मार्च फेरीचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रात राज ठाकरे यांनी तीन मेपर्यंत मशिदीवरील भोंगे सरकारने उतरवावे अन्यथा आम्ही दुप्पट भोंगे लाऊन हनुमान चालीसा म्हणू असे वक्तव्य केल्याप्रकरणी, महाराष्ट्र मध्ये शांतता राहावी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये या दृष्टिकोनातून विरोधकांनी कितीही शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास वंचित बहुजन आघाडी चा संपूर्ण मुस्लिमांना पाठिंबा असून, १ मे महाराष्ट्र दिनी औरंगाबाद येथे राज ठाकरे यांच्या सभेचे आयोजन केल्याने या सभेला सरकारने परवानगी देऊ नये असे आवाहनही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केले होते, या सर्वांना प्रत्युत्तर म्हणून सामाजिक सौहार्द व शांतता मार्च चे आयोजन केले होते.

त्याच अनुषंगाने पुसद येथील तीन पुतळा चौक येथे बहुजन वंचित आघाडी पुसद च्या वतीने सर्व सामाजिक संघटना यांना आव्हान करून महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रदिनी कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी व वंचित बहुजन आघाडी चा सर्व मुस्लिमांना पाठिंबा देण्यासाठी शांतता मार्च चे आयोजन केले होते.या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी तालुका पुसद च्या वतीने बुद्धरत्न भालेराव, उबाळे इत्यादी च्या वतीने सामाजिक एकोपा जपण्यासाठी सर्वच कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात आले.या शांतता मार्च फेरीसाठी प्रामुख्याने उपस्थित म्हणून, वंचित बहुजन आघाडी चे तालुकाध्यक्ष, बुद्धरत्न भालेराव ,शहराध्यक्ष जयानंद उबाळे , प्रज्ञापर्वचे विठ्ठल खडसे, भीमआर्मी चे जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव,राजू टाळीकुटे संघटक यवतमाळ ज्ञानदिप कांबळे ,सचिन सूर्यवंशी, प्रकाश खिलारे, दीपक पद्मे, शंकर करमनकर, मिलिंद पठाडे, प्रशांत सरोदे व महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, इत्यादीसह ग्रामीण,शहर शाखा, कार्यकारिणीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.