✒️सावली(पुरोगामी संदेश नेटवर्क)

सावली(दि-29 जुन)लॉकडाउन सरकारने आणला, लोकांचा रोजगार सरकारने हिरावला, त्यामुळे वीज बिलेही आता सरकारने भरावी. अशी मागणी करीत आम आदमी पार्टी सावली शहर च्या कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयासमोर आज वीज बिलाची होळी केली. वीज बिल माफ करा, आम आदमी पार्टी जिंदाबाद. अशा घोषणा देण्यात आल्यात. आम आदमी पार्टीच्या शहर अध्यक्ष सोनाली भंडारी उपाध्यक्ष रंजिता नायडू, संघटिका कुंदा गेडाम यांचे नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
दिल्लीची केजरीवाल सरकार जर 200 युनिट वीज बिल माफ करू शकते तर महाराष्ट्र सरकार का नाही? असा सवालही यावेळी करण्यात आला.
कोरोणाच्या महामारीत राज्य शासनाने लाॅकडावून जाहीर केले आणि पुढील तीन महिने कुणालाही वीजबिल येणार नाही अशी घोषणाही केली, मात्र तीन महिन्यानंतर एकत्रित, अव्वाच्या सव्वा आकारणी करीत बिल पाठविल्याने नागरिकात असंतोष निर्माण झालेला आहे. आम आदमी पार्टीने विज बिल माफी चे राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. विज बिल माफी साठी सावली शहर शाखेने मागील चार दिवसापासून स्वाक्षरी अभियान राबविले. आज वीजबिल माफीचच निवेदन आणि जनतेकडून घेतलेल्या स्वाक्षऱ्या महावितरण चे अभियंता यांचेमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविले आहे. निषेध म्हणून यावेळी वीज बिलांची होळी करण्यात आली. आप’च्या कार्यकर्त्यांनी मास्क लावीत आणि सुरक्षित अंतर ठेवून महावितरण कार्यालयासमोर हे लाक्षणिक आंदोलन केले
यावेळी अर्चना गद्देकार, वनिता गेडाम, ज्योती राऊत, शालुबाई गेडाम, गोपिका गेडाम आणि आम आदमी पार्टीचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते

Breaking News

©️ALL RIGHT RESERVED