दुसलगाव येथील वाळू धक्का बंद करा व पर्यावरणाचा व निसर्गाचा -हास टाळा

30

🔸पत्रकार व ग्राम पंचायत सदस्य यांचा अवैध वाळु उपस्याच्या विरोधात उपोषणाचा दुसरा दिवस

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.2मे):-निसर्गाचा समतोल व पर्यावरणास हानी करणाऱ्या दुसलगाव येथील वाळू धक्का तात्काळ बंद करून संबंधितांवर योग्य ती कारवाई मागणीसाठी उपविभागीय कार्यालयासमोर महाराष्ट्र दिनापासून दुसलगाव ग्रामपंचायत सदस्यानी उपोषण सुरू केले आहे.

तालुक्यातील दुसलगांव गोदापाञातील वाळू धक्काचा लिलाव झाला यात सर्वे नंबर 29.33 34.35 मधील वाळु उपसा करण्याची परवानगी मजुरा मार्फत करावी मशीनद्वारे वाळू उपसास बंदी असताना ही राञी बेरात्री च्या वेळी गोदापाञातुन वाळू उपसा करण्यास मनाई आसताना ठेकेदार यांनी सर्व नियम अर्थिक धोरणातुन बाजुला सारत जेसीबी व केणीच्या साहायाने मोठ्या प्रमाणात रात्री – बेरात्री वाळुचा उपसा सुरूच ठेवलेला आहे वाळू उपस्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत असुन पाण्याची पातळी खाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे बेकायदा वाळु उपसा सुरू आसताना प्रशासनाने नेमुन दिलेली समिती कागदावरच शिल्लक आहे.वाळू धक्यात राजकीय व्यक्तींचा वरदहस्त असुन प्रशासनावर राजकीय दबाव टाकुन बेसुमार वाळुचा उपसा सुरू आहे.

रावराजुर येथे अवैध वाळू उपसास विरोध करणाऱ्या तरुणाची वाळु माफीयाकडुन खुनाची घटना घडली तर शिवसेना उपजिल्हा प्रमुख यांच्याकडुन तहसील कार्यालयासमोर झोला येथील अवैध वाळू उपसा करणाऱ्याची चौकशी करून धक्का बंद करण्यासाठी उपोषण करण्यात आले असाच प्रकार दुसलगांव ठिकाणी बेसुमार होत असुन बेकायदा वाळु विरोधात आवाज उठवला तर गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना हाताशी धरून निसर्गप्रेमीं ग्रामस्थांना भिती दाखवुन वाळु उपसा केला जात आहे. रावराजुर घटनेची पुर्नवरावृत्ती दुसलगाव येथे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.प्रशासनाने दुसलगाव वाळू धक्यावरील राञीचा वाळू उपसा तात्काळ बंद करून गोदापाञातील केलेल्या वाळू उपसाची मोजणी ईटीएस नुसार करण्याची मागणी गुणवंत मुंजाजी कांबळे ,भुजंग आत्तम पारवे ग्रा.पं. सदस्य दुसलगांव, पत्रकार देवराव नारायणराव जंगले , सय्यद गौस अमिर गणेश श्रीनिवास कचरे ग्रा.पं.सदस्य, दुसलगांव सुनिल बालासाहेब सोळंके ग्रामस्थ दुलसगांव यांनी केली आहे.