उन्हाळी सत्राच्या परिक्षा ऑनलाइन पद्धतीने घ्याव्यात – माणिक मोरे

34

✒️नायगाव(पुरोगामी न्युज नेटवर्क)

नायगाव(दि.3मे):-संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांचा एक ज्वलंत प्रश्न आपणास आढळून येत आहे महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यापीठातील परीक्षा ह्या ऑनलाईन झाल्या पाहिजेत ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांची मागणी असल्याचे महाराष्ट्र फार्मसी कृती समितीचे उपाध्यक्ष माणिक मोरे यांनी ऐका निवेदनाद्वारे केली आहे.विद्यार्थ्यांच्या मागणीला पाठिंबा देत माणिक मोरे म्हणाले की विद्यार्थ्यांना जर ऑनलाईन शिकवले असेल तर त्यांच्या परीक्षाही ऑनलाईन झाल्या पाहिजेत. ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचा विद्यापीठाने घेतलेला निर्णय बदलायला हवा. ऑफलाईन होत असलेल्या परीक्षा हे ऑनलाईन पद्धतीने घेतल्या पाहिजेत .

कारण आपण विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिकवले असून परीक्षासुद्धा ऑनलाइन पद्धतीनेच घेतल्या पाहिजेत अशी आमची मागणी राज्य सरकारकडे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांमध्ये परीक्षा ऑनलाईन घेण्यात याव्यात यासंबंधीची मागणी असून संबंधित मागणीचा विचार विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने करावा अशी विनंती करून राज्य सरकारने ऑफलाईन होत असलेल्या परीक्षा ऑनलाइन स्वरूपात घ्याव्यात अशी मागणी फार्मसी कृती समितीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष माणिक मोरे यांनी सदरील निवेदनात करून त्याच्या प्रती महाराष्ट्रचे उच्च शिक्षण मंत्री ना उदय सामंत यांना दिले आहे.