✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपुर(29जून)-मुस्लिम एजुकेशनल, सोल एंड कल्चरल आर्गेनाईजेशन (मेस्को)चंद्रपुर आपल्या सामाजिक दायित्वाकरीता व कार्यक्रमांकरीता संपूर्ण जिल्ह्यात परिचीत आहे. कोरोना विषाणू संसर्ग पाश्र्वभूमीवर जनतेमध्येे जनजागृती करणे व सुरक्षितता या उद्देशाने मेस्को चंदपूर तफै मास्क वितरण कार्यक्रमाचेआयोजन रविवार 28 जून ला एकाच वेळी तीन ठिकाणी सफलतापूर्वक आयोजित करण्यात आले .या कार्यक्रमांतग॔त जिल्हा सरकारी दवाखाना, जटपुरा गेट व बिनबा गेट या ठिकाणी 5000 मास्क चे वितरण करण्यात आले. सोबत कोविद-19 पासून सरक्षण करण्याकरिता उपाय योजना पोस्टर्स चे माध्यमातून लोकांना समजावून सांगण्यात आले. या कार्यक्रमात सोशल डिस्टेन्सिंग चे विशेष का विशेष ध्यान ठेवण्यात आले. या कार्यक्रमात विशेष करून सरकारी रुग्णालयाचे सामजिक विभाग प्रबंधक श्री उमेश आड़े उपस्थित होते।कार्यक्रम मेस्को चे अध्यक्ष वकील फ़रहत बेग और सचिव हातिम काँचवाला,हमीद भाई लालानी के नेतृत्त्वाखाली संपन्न झाला.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी मैस्को चे उपाध्यक्ष नाहीद हसैन,जहिरभाई काज़ी,डॉ. एजाज़ शेख ,मज़हर खान ,शब्बीर पठान,जूज़र,,जुनेद शेख,इरशाद खान,राजिक खान,अहमद शेख,इमरान शेख,सोहैल शेख ,अज़हर शेख नयांनी अथक परिश्रम घेतले.
कोरोना चे या बिकट परिस्थितीत मेस्को च्या या सामाजिक कर्यक्रमातून समाजाला आरोग्य व एकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला हे विशेष.

चंद्रपूर, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED