सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या राज ठाकरेंना अटक करा

🔸उमरखेड शहरातील मुस्लिम युवकांनी दिले निवेदन

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.2मे):-महाराष्ट्रात सभा घेऊन सामाजिक वातावरण खराब करत असुन राज ठाकरे यांच्यावर कारवाई करून ताबडतोब अटक करण्यात यावी अशी मागणी उमरखेड शहरातील मुस्लिम युवकांनी निवेदनामार्फत केली आहे.मागील काही दिवसांपासून मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे जाहीर सभांमध्ये मुस्लिमविरोधी वक्तव्य करतांना दिसत आहेत.

त्यांच्या अश्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मुस्लिम समाजात संतापाची लाट पसरली आहे.

जाहीर सभेमध्ये ते मुस्लिम समाजाला जाणीवपूर्वक टारगेट करत असून मस्जिदी वरील भोंगे उतरवण्याची पोकळ धमकी ते देत आहेत. तसेच भोंगे नाही उतरवले तर मस्जिदी समोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावावी असे बहुजन समाजाला भडकवून हिंदू मुस्लिम संबंध खराब करीत आहेत.

महाराष्ट्र हा शिव फुले शाहु आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांचा असून महाराष्ट्राचे सामाजिक ऐक्य व हिंदू-मुस्लिम संबंध खराब करण्याची सुपारी जणू राज ठाकरे यांनी घेतलेली आहे असे दिसत आहे.

परंतु राज ठाकरे यांच्या मागील तीन सभांमध्ये धार्मिक तेढ करणाऱ्या भूमिकेमुळे महाराष्ट्राचे सामाजिक वातावरण बिघडले असून यास सर्व:स्व राज ठाकरे हेच जबाबदार आहेत.

त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी व यापुढे महाराष्ट्रात त्याच्या कुठल्याच सभेस परवानगी देण्यात येऊ नये अश्या मागण्याचे निवेदन तेहसीलदार यांन देण्यात आले.

यावेळी नजीर आतिश, रहेमत जागीरदार, सय्यद सज्जाद, शाहरुख पठाण, शेख रहेमान, हाजी इर्शाद, मुजल्लोदीन काजी उर्फ राका, ताबिश खान, फैजान खान, शेख अशफाक आदी उपस्थित होते.

भोंगे काढण्यासाठी आधी स्वतः च्या मुलाला पाठवावे – शाहरुख पठाण (प्रवक्ता, पुरोगामी युवा ब्रिगेड)

“राज ठाकरे हे, भोंगे बंद करा हे भोंग्यातूनच सांगत आहेत, आधी त्यांनी त्यांच्या सभेचे भोंगे बंद करावे नंतर आम्हाला शिकवावे.

भोंगा हा सामाजिक विषय आहे तर राजकीय व्यासपीठावर, राजकीय व्यक्तीकडून राजकीय फायद्यासाठी का वापर केला जात आहे?

राज ठाकरेनी भोंगे काढण्यासाठीची सुरुवात आधी स्वतः च्या मुला पासून करावी.हा शिव-फुले-शाहू-आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे.

बहुजनांची डोके भडकावून स्वतः चा बंद पडलेला रेल्वे इंजिन द्वेषाच इंधन टाकून बंधुत्वाच्या सिग्नल तोडून चालवायचे स्वप्न राज ठाकरे यांनी बघु नये….

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED