विद्यार्थ्यांनो, आपल्या आयुष्यात प्लॅन-बी जरूर ठेवा- ज्ञानेश्वर मोगरकर : ऑनलाईन मार्गदर्शन

  60

  ✒️रोशन मदनकर(उप संपादक)

  तुमसर(दि.2मे):-विद्यार्थ्यांनों , तुमची आता बारावी बोर्डची परीक्षा झालेली आहे. या कोरानाच्या काळात ही पहिली परीक्षा आहे की, जी ऑफलाईन झाली. खुप मेहनत करून आणि सातत्याने अभ्यास करून तुम्ही ही परीक्षा दिली.

  आता बारावी नंतर पुढे काय ??? असा प्रश्न ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांच्या मनात नेहमी सतावत असतो. पुढे कोणत्या महाविद्यालयात प्रवेश करायचा ? कोणते क्षेत्र निवडायचे ? पुढील शिक्षणाकरिता खर्च किती येईल?? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात पडलेले आहेत. तेव्हा मित्रांनो, तुम्हाला जर JEE-NEET ही परीक्षा जर द्यायची असेल तर तुम्हाला विज्ञान क्षेत्र घ्यावा लागेल आणि स्पर्धा परीक्षा, नागरी सेवा परीक्षा यांसारख्या परीक्षा जर तुम्हाला द्यायचे असेल तर पदवीचे शिक्षण हे कला क्षेत्रातून घेतलेच पाहिजे असे जरुरीचे नसून तुम्ही ते कोणत्याही क्षेत्रातून घेऊ शकता. जर तुम्हाला एमपीएससी किंवा युपीएससी यांसारखी परीक्षा द्यायचे असेल तर पदवी शिक्षण सुरू असताना या परीक्षेची तयारी सुरू ठेऊ शकता. काही विद्यार्थी बारावी विज्ञान घेऊन स्पर्धा परीक्षा देणे साठी पदवी शिक्षण हे कला क्षेत्रातुन घेतात. यावरून सामोरच्या पिढीला असा प्रश्न निर्माण होतो की बारावी विज्ञान नंतर कला क्षेत्र योग्य की अयोग्य ? यांमध्ये गोंधळात जायचं काही कारण नाही. तर त्यासाठी तुम्ही कला क्षेत्र घेऊन अभ्यास हा सातत्याने आणि बारीक नजरेने करणे गरजेचे आहे.

  मित्रांनो महत्त्वाचे सांगायचे झाल्यास या जगात देण्यासारखे असे पुष्कळ क्षेत्रातील पुष्कळ परीक्षा आहेत. आणि परीक्षा देण्यासाठी देशातील लाखोंच्या संख्येने विद्यार्थी सहभागी होतात. त्यांपैकी सातसे-आठसे जणांची निवड होते. असे हे स्पर्धांचे युग आहे. तर अशा या जगात विद्यार्थ्यांचे प्लॅन-बी असणे अत्यंत गरजेचे आहे. सोबत प्लॅन-बी असला की या क्षेत्रात निवड झाली नाही तर दुसऱ्या क्षेत्रात निवड होईल असा विश्वास असला पाहिजे. म्हणून विद्यार्थ्यांनी प्लॅन-बी जरूर ठेवावा. असे मार्गदर्शन पुणे येथील म.न.पा प्राथमिक शाळा क्रमांक 69 (मुलींची) येथील शिक्षक मा.श्री. ज्ञानेश्वर मोगरकर सर यांनी केले.

  स्थानिक विद्यार्थी-शिक्षक मंडळ तुमसर आणि माझी माय सरसोती समूह भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून श्री. ज्ञानेश्वर मोगरकर सर आभासी बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून प्रा.संजय लेनगुरे यांनी उच्च शिक्षण ही काळाची गरज असून विद्यार्थ्यांच्या मनात असलेल्या शंकांचे निराकरण करणे अत्यावश्यक आहे करिता मार्गदर्शन सत्र आयोजित करणे हितावह आहे असे सांगितले.

  सदर ऑनलाईन मार्गदर्शन सत्रात तालुक्यातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून श्री. रमेश बोंद्रे सर, सौं.सारिका मांदाडे मॅडम, शालिनी कांबळे मॅडम, श्री.दिलीप करंबे सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल बांडेबुचे यांनी केले तर आभार प्रदर्शन गुलशन,गौपाले सोनाली लाडसे गौपाले यांनी केले.

  *कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अक्षय चौधरी, अपेक्षा आथिलकर, अश्विनी मोहतुरे, धनश्री चित्रीव, राजश्री पटले, हिमांशू महानकर, ईशांत लांजेवार, मंथन बडवाईक, वैशाली वाघमारे, सुमित भगत, भावना बागडे,महेक पठाण, श्रद्धा गोले, अंशुल हरिणखेडे, धनश्री आकरे, ऐश्वर्या भाजीपाले, रजनी बिटलाये,महक बनसोड, रिची चौरे, रणजीत नागपुरे इत्यादींनी परिश्रम घेतले.