अज्ञात ट्रकने दुचाकी स्वाराला धडक दिली

42

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.3मे):-राजीव रतन चौकात एका अनियंत्रित अज्ञात ट्रकने सायकलस्वाराला धडक दिल्याने सायकलस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी सकाळी 10.30 वाजता घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, घुग्घुस नगर परिषद सफाई कर्मचारी अशोक रामबाबू कामपेल्ली हे काम करतात.राजीव हे रतन चौकातून जात असताना मागून येणाऱ्या अज्ञात ट्रॅकने त्याला जोरदार धडक दिली, यात सायकलस्वार अशोक गंभीर जख्मी झाला, जख्मी तरुणाला तातडीने चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.