ग्रामगीता महाविद्यालय चिमुरला नॅक मूल्यांकनात बि प्लस

✒️सुयोग सुरेश डांगे(चिमूर प्रतिनिधी)

चिमूर(दि.3मे):-गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित ग्रामगीता महाविद्यालय चिमूरला बंगलोरच्या राष्ट्रीय मुल्यांकन व मानांकन संस्थेच्या (नॅक) मुल्यांकन समितीने नुकतीच भेट दिली. या भेटीदरम्यान महाविद्यालयाच्या शैक्षणिक , सामाजिक व विद्यार्थी केंद्रित सर्व कार्याचे निरीक्षणे केले होते. यात महाविद्यालयला बी प्लस दर्जा प्राप्त झाला आहे.

चिमूर येथील ग्रामगीता महाविद्यालयाची गुणवत्ता तपासणीसाठी त्रिसदस्य समिती नॅकने नियुक्त केली होती. त्यामध्ये समिती अध्यक्ष म्हणून मॅट्स विद्यापीठ रायपुरचे कुलुगुरू प्रा. डॉ. के.पी. यादव, समिती समन्वयक म्हणून जामिया मिलीया इस्लामिया विद्यापीठ दिल्ली चे प्रा. डॉ. आफताब आलम, डॉ. ए. व्ही. बलीगा कॉलेज कुमटा, उत्तर कन्नड चे माजी प्राचार्य,प्रा. डॉ. गिरीश कुचीनाड (सदस्य) या तज्ञांचा समावेश होता. या समितीने दि. २७ व २८ एप्रिल २०२२ रोजी प्रत्यक्ष भेट देऊन महाविद्यालयाने मागील पाच वर्षात केलेल्या कार्याची तसेच विविध तांत्रिक बाबी व कागदपत्रांची पडताळणी करून आजी व माजी विद्यार्थी, पालक यांच्याशी चर्चा केली होती.

महाविद्यालायचे शैक्षणिक कामकाज, संशोधन व सामाजिक कार्य , पायभूत सोयीसुविधा ईत्यादी बाबींचे मुल्यमापन करून त्याचा अहवाल नॅक बंगलोर येथे पाठविला होता अंतिम निकालाची प्रतीक्षा महाविद्यालय प्रशासन करीत होते.त्याचा निकाल प्राप्त झाला असून महाविद्यालयाला बि प्लस दर्जा मिळाला आहे.या समितीमार्फत होणाऱ्या मुल्यांकनाच्या तयारीसाठी महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. अमीर धमानी यांच्या नेतृत्वात महाविद्यालय नॅक समितीचे समन्वयक प्रा. हुमेश्वर आनंदे आणि ईतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यानी अतिशय मेहनत घेऊन या मूल्यांकनामुळे महाविद्यालय प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे अशी माहिती दिली.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED