मुख्याध्यापिका सौ. दिपा पोफाळकर मॕडम यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला

26

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.3 मे):- शहरातील शहीद भगतसिंग न. प. प्राथ.व माध्यमिक शाळा क्र 2 येथे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दिपा दि. पोफाळकर मॕडम यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवनियुक्त मुख्याध्यापक श्री. सुर्यवंशी सर तर प्रमुख पाहूणे म्हणून न.प शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी श्री.भगवान हिंगाडे सर, केंद्रप्रमुख राहत अन्सारी सर होते.

तर विशेष अतिथींमध्ये श्री अजीत थोरात साहेब, शा व्य. समिती अध्यक्ष श्री अनिल नरवाडे हे होते न.प. च्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक-शिक्षीका मोठ्या संख्येने हजर होते.

यावेळी पाहुण्यांचे स्वागतपर स्वागतगीत शाळेतील ई9वी च्या विद्यार्थीनींनी गायीले. कार्यक्रम प्रास्तविक श्री बुरफूले सर यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डाॕ. कवडे सर यांनी केले.

यावेळी अनेक मान्यवरांनी मॕडम यांच्या कारकीर्दीतील आठवणींना उजाळा दिला.

मॕडम यांच्या नेतृत्वाखाली शाळेत अनेक उपक्रम राबवल्या गेले त्यामुळे शाळेची वाटचाल मोठ्या जोमाने सुरू आहे अशी भावना अनेक वक्त्यांकडून व्यक्त झाली.

अतिशय भावूक वातावरणात आपल्या लाडक्या मुख्याध्यापिकेला शहीद भगतसिंग शाळा परिवाराकडून जोरदार स्वागत करण्यात आले .

यावेळी शाळेला आकर्षक पद्धतीने सजवण्यात आले होते.
कार्यक्रमानंतर सर्व आमंत्रितांना भोजन देण्यात आले.

व मॕडम यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. शेवटी कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन सौ. धुळे मॕडम यांनी केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री कोरडे सर, श्री चौधरी सर, श्री जाधव सर, श्री राठोड सर श्री काळै सर, श्री संतोष काळे सर, श्री दुधेवार सर, कु म्हैसकर मॕडम, नंदनवार मॕडम, सोनेवाड मॕडम, कलाने मॕडम, कदम मॕडम, बोके मॕडम, वानखेडे मॕडम, श्री साकळे सर, साबळे भाऊ, पाईकराव ताई, वाढवे ताई, टेंभरे ताई यांनी आथक परिश्रम घेतले.