


✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)
घुग्घुस(दि.4मे):- येथील कोळसा सायडिंगच्या बाजुला असलेल्या इदगाह मैदानावर मुस्लिम बांधवानी आलिंगन करून ईदच्या एकमेकांना शुभेच्छा देऊन मोठ्या उत्साहाने रमजान ईद साजरी करण्यात आली.देशात सौहार्दपूर्ण वातावरण कायम राहो व परस्परांमध्ये प्रेम संबंध टिकून राहणे त्याचबरोबर आजारी नागरिकांना चांगले स्वास्थ्य व बेरोजगारांना रोजगार मिळावा आणि बरेच अडचणीत असलेल्या नागरिकांच्या समस्येतून सुटका व्हावी,याकरिता प्रार्थना करण्यात आली.रमजान ईदच्या मुस्लिम बांधवांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या पोलीस कर्मचारी व येथील अन्य पक्षाच्या नेतानी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी पोलीस ठाणेदार बबन पुसाटे,भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे,कॉंग्रेस किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे,राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष दिलीप पिट्टलवार,कॉंग्रेसचे राजु रेड्डी,सामाजिक कार्यकर्ते ईबादुल सिद्धकी, संतोष नुने,निरिक्षण तांड्रा, इम्तियाज रज्जाक, संजय तिवारी, हेमंत पाझारे,सुरेश पाईकराव, पवन आगदारी, पोलीस कर्मचारी व मुस्लिम बांधव उपस्थित होते.MI




