


✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114
बीड(दि.4मे):-राज्य निवडणूक आयोगाने निधन, राजीनामा, अपात्रता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील सदस्यांच्या रिक्त झालेल्या जागांचा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार राज्यातल्या ३३ जिल्ह्यामधील २४७० ग्रामपंचायतींच्या ३२५३ जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. त्याअंतर्गत धुळ्यातील ४० ग्रामपंचायतींच्या ४८ जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहेत. पोटनिवडणुकीसाठी गुरुवार (दि.५) रोजी तहसीलदार स्तरावरून निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर शुक्रवार (दि.१३) ते सोमवार (दि.२३) दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत उमेदवारी अर्ज मागवण्यात येणार आहे.
या उमेदवारी अर्जाची छाननी सोमवार (दि.२३) रोजी सकाळी ११ होणार असून अर्ज माघारीसाठी बुधवार (दि.२५) पर्यंत मुदत देण्यात आली आहे. निवडणूक चिन्हांचे वाटप देखील दि. २५ मे रोजी होणार असून उमेदवारांची अंतिम यादी त्याच दिवशी प्रसिद्ध केली जाईल. तर दि. ५ जून रोजी पोटनिवडणुकीसाठी आवश्यक असल्यास मतदान घेण्यात येणार असून मतमोजणी दि.६ जून रोजी होईल. ह निवडणकू राज्यातील ३३ जिल्ह्यांमधील २४७० ग्रामपंचायतींच्या ३२५३ जागांसाठी होणार आहे.
यामध्ये ठाणे ३३ ग्रामपंचायतींच्या ६३ जागा, पालघर २२ ग्रामपंचायतींच्या ५३ जागा, रायगड १२३ ग्रामपंचायतींच्या १७२ जागा, रत्नागिरी १२८ ग्रामपंचायतींच्या १६४ जागा, सिंधुदुर्ग ७६ ग्रामपंचायतींच्या ६० जागा, नाशिक १२२ ग्रामपंचायतींच्या १८२ जागा, धुळे ४० ग्रामपंचायतींच्या ४८ जागा, जळगाव १०० ग्रामपंचायतींच्या ११३ जागा, नंदुरबार २५ ग्रामपंचायतींच्या ३३ जागा, अहमदनगर १०३ ग्रामपंचायतींच्या १४० जागा, पुणे २२२ ग्रामपंचायतींच्या २४३ जागा, सोलापूर ५४ ग्रामपंचायतींच्या ४६ जागा, सातारा २१० ग्रामपंचायतींच्या ४२१ जागा, सांगली ५३ ग्रामपंचायतींच्या ४५ जागा, कोल्हापूर ६९ ग्रामपंचायतींच्या ८५ जागा, औरंगाबाद ५८ ग्रामपंचायतींच्या ४९ जागा, बीड ४६ ग्रामपंचायतींच्या ३८ जागा, नांदेड १२८ ग्रामपंचायतींच्या १८२ जागा, उस्मानाबाद ३३ ग्रामपंचायतींच्या ३१ जागा, परभणी २८ ग्रामपंचायतींच्या १८ जागा, जालना ३२ ग्रामपंचायतींच्या २७ जागा, लातूर ६८ ग्रामपंचायतींच्या ७३ जागा, हिंगोली २९ ग्रामपंचायतींना ३५ जागा, अमरावती ५८ ग्रामपंचायतींच्या ८२ जागा, अकोला १२८ ग्रामपंचायतींच्या २०७ जागा, वाशिम ९४ ग्रामपंचायतींच्या १३७ जागा, बुलढाणा ६३ ग्रामपंचायतींच्या ८० जागा, नागपूर ५३ ग्रामपंचायतींच्या ५५ जागा, वर्धा ४३ ग्रामपंचायतींच्या ५३ जागा, चंद्रपूर ५१ ग्रामपंचायतींच्या ५३ जागा, भंडारा ४३ ग्रामपंचायतींच्या ६२ जागा, गोंदिया ४६ ग्रामपंचायतींच्या ३४ जागा तर गडचिरोली ८९ ग्रामपंचायतींच्या १६९ जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील एकही ग्रामपंचायतीची जागा रिक्त नसल्याने येथे मात्र पाटनिवडणूक होणार नाही.




