आदर्शमाता प्रतिष्ठान च्या वतीने मुस्लिम बांधवांचा ईद निमित्त सत्कार

✒️कराड(पुरोगामी न्युज नेटवर्क)

कराड(दि.4मे):- – पाडळी कैसे तालुका कराड येथील आदर्श माता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठान च्या वतीने मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद निमित्त पुष्पगुच्छ आणि पेढे देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विश्वास मोहिते प्रतिष्ठानचे सातारा जिल्हा कार्याध्यक्ष अजय सूर्यवंशी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी रमजान ईद निमित्त कराड नगरीचे माजी उपनगराध्यक्ष अल्ताफ शिकलगार, जान फाउंडेशनचे अध्यक्ष जावेदभाई नायकवडी यांचा प्रतिष्ठानच्या वतीने पेढे आणि पुष्पगुच्छ देऊन ईद निमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना कराड नगरीचे माजी उपनगराध्यक्ष अल्ताफ शिकलगार म्हणाले, सर्व जाती- धर्मांना सोबत घेऊन चालणाऱ्या विचारधारावरती काम करणारे आदर्शमाता प्रतिष्ठान चे कार्य उल्लेखनीय असून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED