धामक ते नेर परसोपंत एसटी बस अखेर सुरू

🔹प्रवाश्यांना मिळाला दिलासा

🔸माजी सरपंच प्रवीण चौधरी यांचे यशस्वी प्रयत्न

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193

अमरावती(दि.4मे):-नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धामक येथे येणारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची नेर आगाराची एसटी बस कोरोणाच्या कालावधीमध्ये आणि एसटी कर्मचाऱ्याच्या संपामुळे बंद करण्यात आली होती त्यामुळे धामक येथून नेर परसोपत येथे येता जाताना प्रवाश्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता.

त्यामुळे धामक येथील माजी सरपंच प्रवीण चौधरी यांनी याबाबत नेर परसोपत एसटी आगाराचे व्यवस्थापकांची भेट घेऊन ही समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिली आणि धामक नेरपरसोपंत ही एसटी बस ताबडतोब सुरू करण्याची त्यांना विनंती केली असता नेर परसोपंत येथील एसटी आगाराचे व्यवस्थापकानी माजी सरपंच प्रवीण चौधरी यांची मागणी विनाविलंब मंजूर करून एसटी बस सुरू करून दिली त्यामुळे नागरी प्रवाशांची मोठ्या प्रमाणात सोय झाली आहे.

त्यामुळे प्रवश्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे ही बस नेर परसोपंत, वटफळी, शिंगणापूर, पिंपरी (कलगा) येवती ,धामक, बेलोरा,अस्या अनेक गावातून येणे जाणे करणार असल्याने विद्यार्थी व वृद्ध पुरुष व महिला प्रवाष्याची मोठ्या प्रमाणात सोय झाली आहे त्यामुळे या सर्व प्रवाष्यानी धामक येथील माजी सरपंच प्रवीण चौधरी यांचेसह नेरपरसोपंत एसटी आगाराचे व्यवस्थापक यांचे आभार व्यक्त केले आहे.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED