साहित्य स्पंदन समुहाचे भरले ऑनलाईन काव्यसंमेलन

✒️नवनाथ आडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)

बीड(दि.4मे):-साहित्य स्पंदन समूहाचे दुसरे ऑनलाईन काव्यसंमेलन मोठया उत्साहात पार पडले.1 मे महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून राज्यभरातील कानाकोपऱ्यातील 23 निमंत्रित कवी ऑनलाईन उपस्थित होते.तब्ब्ल अडीज तास चाललेल्या या संमेलनात प्रथमतः साहित्य स्पंदन समूहाचे प्रमुख कवयित्री सुप्रिया भिंगारे (नवी मुंबई ) व कविवर्य.प्रशांत गोरे (अहमदनगर ) यांनी प्रास्ताविक करून काव्यमैफिलीस सुरुवात केली.

या संमेलनात उपस्थित राहिलेले नामवंत प्रतिष्ठीत कविवृंद. श्री महेंद्र वानखेडे,श्री. रविंद्र जावके,श्री सुरज अंगुले,भार्गवी येवले, संध्याराणी कोल्हे,कल्पना गायकवाड, माधुरी इनामदार,स्वाती दरेकर, प्राजक्ता घर्वे -घोगले, विनायक धानोरकर,अँड.वर्षा जाधव,सुवर्णा वाणी, चंद्रकला अमृतकर,संतोष मते, सुनिता महाजन,आदिती कोतकर, गजानन उफाडे आदी. दिग्गज कवीवर्गानी कविता सादरीकरण करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.

महाराष्ट्र दिनाच्या सायंकाळी संपन्न झालेल्या काव्यसंमेलनाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.महाराष्ट्राच्या अस्मितेचं गुणगान शब्दांशब्दातून प्रकट झालं. साहित्यिकांच्या सेवेत साहित्य स्पंदन समूह नवसाहित्यिकांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देते.काव्यसंमेलनाखेरीज अन्य उपक्रम देखील राबवले जातात. एकंदरीत अल्पवधीतच नावलौकिक मिळवलेल्या या स्पंदन समूहाने नवख्या साहित्यिकवर्गाला स्पंदन समुहाच्या रूपात एक मंच उपलब्ध करून दिला.

बीड, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED