विदया निकाळजे यांना राज्यस्तरीय हिरकणी उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार वितरित

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.4मे):-गिरवी ता फलटण येथील अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्राच्या कार्यकारी संपादक सौ. विदया सुरजकुमार निकाळजे यांना सन 2021 – 2022 चा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार नुकताच वितरित करण्यात आला.संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात अष्टभुजा हिरकणीच्या माध्यमातून महिलांचे संघटन करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सौ निकाळजे यांनी मोठे कार्य केले आहे. अष्टभुजा हिरकणी हे महिलांनी महिलांच्या न्याय व हक्कासाठी चालविलेले एकमेव वृत्तपत्र आहे .सौ निकाळजे यांनी महिलांच्या हाती लेखणी देऊन संपूर्ण महाराष्ट्रात महिला पत्रकार निर्माण केल्या आहेत.

सौ निकाळजे यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी
जालना येथील उज्ज्वल बहुद्देशीय संस्थेच्या वतीने सौ निकाळजे यांना उत्कृष्ट संघटक व उत्कृष्ट पत्रकारिता बद्दल राज्यस्तरीय हिरकणी पत्रकारिता पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.

सिल्लोड येथील सहायक पोलिस निरीक्षक नालंदा लांडगे यांच्या हस्ते,प्रसिद्ध उद्योजक शिवरतन मुंदडा,उज्ज्वल बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ करुणा अच्युत मोरे,डॉ सचदेव,पत्रकार अच्युत मोरे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला.सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.विदया या कोरेगाव तालुक्यातील जांब बु येथील विनायक व मंदा बोडके यांची कन्या व गिरवी ता फलटण येथील अष्टभुजा फाऊंडेशन चे संस्थापक सुरजकुमार निकाळजे यांच्या पत्नी आहेत.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED