कार्यसम्राट आमदार लक्ष्मण आण्णा पवार यांच्या आमदार फंडातून दहा लक्ष रुपयाचे सिमेंट रस्ता नालीचे काम पूर्ण

29

🔹सर्वसामान्य कार्यकर्त्याला गावात विकास काम करण्यासाठी बळकटी देणारा नेता म्हणजे कार्यसम्राट आमदार लक्ष्मण आण्णा पवार ओळख

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

गेवराई(दि.4मे):- तालुक्यातील जातेगाव येथील गावात जाण्यासाठी मुख्य रस्ता नसल्याने व गावातील मिरवणूक मार्ग खड्डे असल्याने या भागात सिमेंट रस्ता करण्याची मागणी गावकऱ्यांनी भाजप पदाधिकारी यांच्याकडे केली होती याची दखल घेऊन कार्यसम्राट आमदार लक्ष्मण आण्णा पवार यांनी गोपाल भैया चव्हाण यांना दस लक्ष रुपयाचे सिमेंट रस्त्याचे काम तात्काळ मंजूर करून विकास कामे करण्यासाठी मदत केल्याने गावकऱ्यांनी कार्यसम्राट आमदार लक्ष्मण आण्णा पवार यांचे आभार मानले असून गोपाल भैया चव्हाण यांनी श्रीकृष्ण मंदिर ते मारुती मंदिर आणी वाघमारे गल्लीत दर्जेदार सिमेंट रस्ता नाली बांधकाम काम नुकतेच पूर्ण केले असून लवकरच कार्यसम्राट आमदार लक्ष्मण आण्णा पवार यांच्या हस्ते कामाचे लोकार्पण होणार आहे.

एक सामाजिक कार्यकर्ते ते कार्यसम्राट आमदार लक्ष्मण आण्णा पवार यांचे निष्ठावंत लक्ष्मण सैनिक म्हणून गोपाल भैय्या चव्हाण यांच्याकडे जातेगाव येथे पाहिले जाते आपल्या गावात विविध विकास कामे लक्ष्मण आण्णा पवार यांच्या माध्यमातून करणार असल्याची माहिती गोपाल भैय्या चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली भाजपाचे जातेगाव चे जेष्ठ नेते बाबुराव भाऊ चव्हाण, सरपंच सतिश चव्हाण सर, संदिपान दादा चव्हाण कल्याण वाघमारे, भरत दादा चव्हाण, दादासाहेब चव्हाण,शाम चव्हाण, हरिभाऊ चांभारे, सुरेश काका चव्हाण, यांच्या सह युवा नेते गोपाल भैय्या चव्हाण व गावकऱ्यांनी विशेष कार्यसम्राट आमदार लक्ष्मण आण्णा पवार यांचे आभार मानले आहेत