गेवराई तालुक्यातील सोसायटीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा

25

🔸३२ सोसायट्यांपैकी ३१ सोसायट्या_राष्ट्रवादीच्या ताब्यात

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

गेवराई(दि.५मे):-गेवराई तालुक्यात आतापर्यंत ३१ सेसायटीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहिर झालेला असुन ३१ पैकी २२ सोसायट्या बिनविरोध झालेल्या असुन ९ सोसायटीच्या निवडणुका झालेल्या आहेत. अशा एकूण ३१सोसायट्या माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित आणि जि.प.चे माजी अधयक्ष विजयसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ताब्यात आल्या आहेत.

वडगांव (सुशि), चकलांबा, उक्कडपिंप्री, सिरसमार्ग, सुरळेगांव, पौळाचीवाडी, कटचिंचोली, भेंडटाकळी, गायकवाड जळगांव, कोल्हेर, औरंगपूर कुकडा, तळणेवाडी, हिरापूर, लोळदगांव, इटकुर, सावळेश्वर, कुंभे जळगांव, पिंपळगांव कानडा, राक्षसभुवन, बर्‍हाणपूर, खामगांव या सोसायट्या बिनविरोध झालेल्या असुन राष्ट्रवादीच्या ताब्यात आलेल्या आहे. खांडवी, मालेगांव खु, भोजगांव, ठाकर आडगांव, जातेगांव, पाचेगांव, बोरगांव बु. केकतपांगरी, सुर्डी या सोसायटीच्या निवडणुका झालेल्या असुन भाजपा-सेनेचा दारुन पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेसने या सोसायट्यावर वर्चस्व प्रस्थापित केले.

या पैकी चार सोसायटीच्या चेअरमन आणि व्हा. चेअरमनच्या निवडणुका संपन्न झाल्या असुन यामध्ये सुरळेगांव सोसायटीच्या चेअरमनपदी सतिष नरवडे, व्हा. चेअरमन पदी बप्पासाहेब कदम, सावळेश्वर सोसायटीच्या चेअरमन पदी शिवाजी कुटे आणि व्हा. चेअरमन पदी संजय उधे, खामगांव सोसायटीच्या चेअमरन पदी भाऊसाहेब शिंदे तर व्हा. चेअरमन पदी जगन्नाथ मचे तर जातेगांव सोसायटीच्या चेअमरनपदी कौशल्या पवार आणि व्हा. चेअमरन पदी श्रीहरी पांढरे यांची एकमताने निवड झाली.

आतापर्यंत झालेल्या ३२ सोसायट्यांपैकी ३१ सोसायट्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आल्यामुळे गेवराई तालुक्यातील सहकार क्षेत्रावर माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे वर्चस्व दिसुन आहे आहे. माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित आणि विजयसिंह पंडित सर्व पदाधिकारी यांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.