प्रवासी निवारे कोरपना चौकात देण्याची भाजपा तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर यांची मागणी

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.5मे):-कोरपना तालुका होऊन आज बरीच वर्षे झाले परंतु याठिकाणी साधा प्रवासी निवारा नाही दररोज तालुक्याच्या ठिकाणी विविध कामांकरिता हजारो नागरिक येत असतात परंतु कोरपना चौकांमध्ये पान टपरी हॉटेल दुकान यांचा आसरा घेऊन नागरिकांना बस ची वाट पाहत ताटकळत उभे राहावे लागते ऊन वारा पाणी यांचा सामना करत आज या तालुक्यातील नागरिक अजूनही प्रवासी निवारा च्या प्रतीक्षेत आहेत.

या विधानसभेतील आमदार यांनी सामान्य नागरिकांच्या समस्येची जाण लक्षात घेऊन कोरपना तालुक्याच्या ठिकाणी प्रवासी निवारा देण्यात यावा अशी मागणी भाजपा तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर यांनी केली आहे कोरपना तालुक्यातील नव्हे तर परसोडा गोविंदपुर दूरगाडी महेंदी कोढोडा, पार्टी चोपण, कन्नडगाव भोपळा वनसाडी, धामणगाव नारांडा आसन इंदापूर आधी गावातील बसस्थानकांवर या ठिकाणी सुद्धा प्रवासी निवाऱ्याची व्यवस्था करण्यात यावीत अशी मागणी हिवरकर यांनी केली वारंवार मागणी केल्यानंतरही याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने नागरिकांत संतापाचे वातावरण आहे.

.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED