आमदार देवेंद्र भुयार यांच्या पुढाकाराने मोर्शी वरुड तालुक्यातील १०० किलो मीटर पांदण रस्ते मंजूर !

81

✒️मोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मोर्शी(दि.6मे):- वरुड तालुका संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून शेतातील संत्रा काढण्याकरिता मोठे वाहन शेतात नेण्याकरिता अडचणींचा सामना करावा लागतो शेतकऱ्यांना वहिवाटीकरिता पांदण रस्त्यांची मोठी अडचण आहे. हीच अडचण लक्षात घेता मोर्शी तालुक्यातील संपूर्ण पांदण रस्ते मोकळे करून पूर्णत्वास नेण्यासाठी आमदार देवेंद्र भुयात यांनी पुढाकार घेतला आहे.मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी वरुड तालुक्यात १०० किलो मीटर पांदण रस्त्याची कामे मंजूर केली असून बाकी पांदण रस्त्यांची कामे त्वरीत पूर्ण केली जाणार असल्याचे सांगितले.शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असणारे पांदण रस्ते त्वरीत पूर्ण करण्याच्या उद्देशाने मोर्शी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पांदण रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. त्याच अनुषंगाने आमदार देवेंद्र भुयार यांच्या पुढाकाराने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत मातोश्री ग्राम समृद्धी पांदण रस्ते योजने अंतर्गत मोर्शी तालुक्यातील ५० किलोमीटर पांदण रस्ते व वरुड तालुक्यातील ५० किलो मीटर पांदण रस्ते असे एकून १०० किलो मीटरच्या पांदण रस्त्यांचे खडीकरण करण्याच्या कामांना मंजुरात मिळाली आहे.

आमदार देवेंद्र भुयार यांचा शेतकऱ्यांच्या समस्या सोडविणे हा जिव्हाळ्याचा विषय आहे. शेतकऱ्यांना शेतातील शेतमाल काढण्याकरिता व शेतात जाण्याकरिता पांदण रस्त्याची दुरावस्था पाहून शेतकऱ्यांच्या पांदण रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला. यांत्रिकीकरणामुळे शेतामध्ये पेरणी, अंतरमशागत, कापणी, मळणी यासारखी कामे यंत्रांमार्फत करण्यात येतात अशा यंत्र सामग्रीचा वाहतूक करण्याकरता पावसाळ्यातही शेत पांदण रस्ते सुयोग्य असणे काळाची गरज आहे.आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी वरुड तालुक्यातील पांदण रस्ते पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. या दृष्टिकोनातून मातोश्री ग्राम समृद्धी पांदन रस्ते योजना राबविण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने कामांचे नियोजन करण्यात आले आहे. २७ एप्रिल रोजी मोर्शी वरुड तालुक्यातील १०० किलो मिटर पांदण रस्त्याची कामे मंजूर करण्यात आली असून उर्वरित पांदण रस्त्यांची कामे त्वरीत पूर्ण केली जातील, असे आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना शेतातील शेतमाल काढणे, शेतीला लागणारी यंत्रसामग्री शेतापर्यंत नेणे, शेतकऱ्यांनी पिकविलेला माल बाजारात पोचविणे आदी निकडीच्या बाबी आता सुकर होण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी आवश्यक बारमाही शेतरस्त्यांच्या पाणंद रस्त्यांच्या कामांना गती देण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून आमदार देवेंद्र भुयार यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. या निर्णयामुळे अतिक्रमण झालेले रस्ते मोकळे होण्यासह कच्च्या व पक्क्या पाणंद रस्ते निर्मितीच्या कामांचा वेग वाढणार आहे मोर्शी वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या पांदण रस्त्यांचे काम आमदार देवेंद्र भुयार यांनी मार्गी लावले असल्यामुळे मोर्शी वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांनी आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार मानले.