आ. रमेश लटके यांनी आपल्या विकास कामांचा आढावा द्यावा. :- पॅन्थर डॉ. राजन माकणीकर

42

✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मुंबई(दि.6मे):- अंधेरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आ. रमेश लटके यांनी आपल्या विकास कामांचा आढावा अन्यथा अशी जाहीर सुचणा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी सोसिएल मेडिया द्वारे केली आहे.

पॅन्थर ऑफ सम्यक योद्धा या समाजिक लढवय्या संघटनेचे संस्थापक महासचिव पॅन्थर डॉ. राजन माकणीकर पुढे म्हणाले की, आमदार रमेश लटके यांनी त्यांच्या कारकिर्दीत कोन-कोनती विकासकामे केली आहेत, विकास कामासाठी कोणता निधी कुठे कोणत्या कामासाठी वापरला जाहिर स्पष्टीकरण द्यावे.

आमदार म्हणून निवडून आल्यापासून कितीदा मतदारसंघात् भेटी दिल्या. कोरोना काळात किती लोकांना कोन-कोणती मदत पुरवली? किती अन्न धान्यांच्या किट चे कुठे वाटप केले. किती कोरोना मयत्याच्या कुटुंबांना भेटून त्यांचे सांत्वन्न करून त्यांना आर्थिक मदत केली किंवा शासनाकडून मिळवून दिली.

शिवाय किती रुग्णांना ऑक्सिजेन पुरवले, किती रुग्णांना ईस्पीतळात दाखल केले. किती रुग्णांना व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले, किती कोरोना पीडित कुटुंबाना कोणत्या स्वरूपात मदत केली. कोन-कोनत्या वस्त्यांमध्ये आमदार साहेबांनी फेरफटका मारून इम्यूनीटी गोळ्या फळ फलाहार वा पौस्टिक अण्ण वाटप केले.

या सर्व प्रश्नाची उत्तरे आ. रमेश लटके यांनी जाहीर स्वरूपात मतदारांना द्यावीत अन्यथा आपल्या संविधानिक पदाचा राजीनामा देऊन घरी बसावे असा इशाराही विद्रोही पत्रकार पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी दिला.