कोल्हापुरी बंधाऱ्यामुळे शेती उत्पन्नात वाढ होऊन गावच्या विकासाला चालना मिळेल – आ. बाळासाहेब आजबे

28

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.6मे):-शासकीय नियमाप्रमाणे पाझर तलाव किंवा गाव तलावच्या साईट बसत नसल्याने आणि पाणी उपलब्धतेसाठी अडचणी येत असल्याकारणाने तलाव करणे शक्य होत नाही त्यामुळे आता ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी नदीवर कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे बांधून सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, ज्या ठिकाणी कोल्हापुरी बंधारा करणे शक्य आहे अशा ठिकाणी आपण निधी उपलब्ध करुन देऊ त्यामुळे गावातील सिंचन क्षेत्र वाढण्यासाठी मदत होणार असल्याचे प्रतिपादन आमदार बाळासाहेब आजबे यांनी बेलगाव येथे बोलताना सांगितले.आष्टी तालुक्यातील बेलगाव येथे एक कोटी ११ लाख रुपये किमतीच्या कोल्हापूरी बंधारा कामाचे उद्घाटन आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमासाठी आष्टी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब चौधरी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजी राऊत, जि. प. सदस्य सतिश शिंदे, किशोर हंबर्डे, रामभाऊ खाडे, सुधिर जगताप, बबनराव पडोळे, अशोक आन्ना पोकळे, भाऊसाहेब घुले, माजी शिक्षणाधिकारी विक्रम पोकळे, पाटोदा तालुका अध्यक्ष शिवभूषण दादा जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना आमदार आजबे म्हणाले की बेलगाव गावामध्ये आज पर्यंत दोन वर्षात आपण जवळपास दोन कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत. यापुढेही मोठ्या प्रमाणात विकासकामे बेलगावमध्ये आपण सर्वांच्या सहकार्याने करणार आहोत, मतदारसंघांमध्ये सिंचन क्षेत्र वाढण्यासाठी योग्य ठिकाणी साखळी बंधारे व कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे करणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी नदीवर बंधारे करणे शक्य आहे अशा ठिकाणी कार्यकर्त्यांनी सर्वे करून हे बंधारे करून घेणे गरजेचे आहे. या कामासाठी लागणारा निधी आपण कमी पडू देणार नाहीत. सिंचन क्षेत्र वाढले तरच तालुक्‍यातील उत्पन्न वाढणार आहे व गावागावात विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे ठिक ठिकाणी बंदारे व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे होणे गरजेचे असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषद सदस्य सतीश आबा शिंदे बोलताना म्हणाले की आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या माध्यमातून आपण बेलगाव मध्ये यापुढेही अनेक विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देणार आहोत. बेलगावकर यांनी आतापर्यंत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीला चांगली साथ दिली आहे.

यापुढेही आपण अशाच प्रकारे साध्य देऊन सहकार्य करावे आम्ही विकास कामात कमी पडणार नाही असे यावेळी त्यांनी सांगितले ,
किशोर हंबर्डे बोलताना म्हणाले कि आमदार बाळासाहेब आजबे काका त्यांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये जलक्रांती होत आहे, बेलगाव हे पक्षीय मतभेद बाजूला ठेवून विकास कामासाठी नेहमी एकत्र येणारे गाव आहे त्यामुळे बेलगावकर यांच्या पाठीशी आम्ही सदैव उभा असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास भोपळे यांनी तर आभार माझी शिक्षण अधिकारी विक्रम पोकळे यांनी मानले.

या कार्यक्रमासाठी आण्णासाहेब चौधरी, डॉ. शिवाजी राउत, शिवभूषण जाधव,सरपंच रामकिसन पोकळे, बन्सीभाऊ पोकळे,अँड. आदिनाथ पोकळे, शाखा अभियंता सुरेश मुंढे, गणेश पोकळे, फुलचंद पोकळे, सतिष पोकळे, ज्ञानेश्वर पोकळे, अमृत पोकळे,अँड. शिंदे मामा, अँड. उध्दव पोकळे, मोहन पोकळे मूकादम, रावसाहेब पोकळे, जालिंदर पोकळे, जयसिंग पोकळे, संजय पोकळे, सतीश पोकळे, अनिल पोकळे, तात्या शिंदे, गोरख पाखरे, संदीप पोकळे, दगडू पोकळे, बाबासाहेब पोकळे, अनंता पोकळे, गणेश पोकळे, अमोल पोकळे, तुळशीराम पोकळे, अतुल पोकळे, बंडू पोकळे यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.