शेळीनं दारात लावलेल्या झाडाचा शेंडा खाल्ल्यामुळे वाद

🔸परळी तालुक्यातील वसंत नगर तांडा येथील घटना

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.6मे):जिल्ह्याच्या परळी तालुक्यातील वसंत नगर तांडा येथे घडली. अतरंगी घटना कधी कोणता वाद कोणत्या कारणाने पेटेल हे सांगता येणे शक्य नाही. वाद निर्माण झाला. तो वाद कोणत्या टोकाला घेऊन जातो आणि प्रसंगी यात मारामारी, जखमी होणे ते जीवावर सुद्धा बेतलं जाणे, असे वाद पेटलेले अनेक वेळा दिसून येतात. अशाच प्रकारच्या वादाचे मजेशीर कारण जुजबी वाटत असले तरी या वादातून शिवीगाळ, लाथाबुक्क्यांनी मारहाण, काठीने मारहाण ते डोके फोडाफोडीपर्यंत गेल्याची घटना परळी तालुक्यातील वसंत नगर तांडा येथे घडली आहे. याप्रकरणी एका साठ वर्षीय महिलेच्या फिर्यादीवरून एका कुटुंबाविरुद्ध ग्रामीण पोलिसांनी गुन्हा देखील नोंदविला आहे.

वसंतनगर तांडा येथील फिर्यादीस आरोपीतांनी संगनमत करून शेळीला आमचे दारासमोर ठेवलेल्या बकेटमधील पाणी का पिवु दिले व माझ्या दारात लावलेल्या आंब्याच्या झाडाचा शेंडा का खावु दिला, असे म्हणून शिवीगाळ केली. आरोपींनी हातातील दगडाने फिर्यादीच्या डोक्यात मारून फिर्यादीस जखमी केले. तसेच लाथाबुक्क्यांनी व चापटाने मारहाण केली. यादरम्यान, फिर्यादीची मुलगी वाद सोडवण्यासाठी आली असताना तिलाही लाथाबुक्कयानी, चापटाने, काठीने मारहाण केली व जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. या आशयाच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत. मात्र, या घडलेल्या अतरंगी घटनेमुळे गावात चर्चेला उधाण आले आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED