


✒️रोशन मदनकर(उप संपादक)
चंद्रपूर(दि.6मे):- सिद्धार्थ बुद्ध विहार एसटी वर्कशॉप जवळ तूकुम चंद्रपूर येथे बौद्ध संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
तथागत बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमे समोर मेणबत्ती प्रज्वलित करून आणि पुष्पहार अर्पण करण्यात आला. संविधानाच्या प्रत ही समोर ठेवण्यात आली होती.सुरवातीला संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन करण्यात आले. नंतर पाहुण्यांचे स्वागत पुढे बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरवात झाली. उदघाटन गौरी शंकर टिपले यांनी करून आपले मनोगत व्यक्त केले. मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी प्राचार्य दिनकर टिपले हे होते. तर अतिथी म्हणून प्राध्यापक नैनंता टिपले नागपूर, प्राध्यापक सुनीता टिपले भिलाई, डॉ प्रशांत टिपले नागपूर, डॉ शिल्पा टिपले चंद्रपूर, अविनाश टिपले चंद्रपूर, इंजी, कमलेश टिपले नागपूर, गोकुळ सखाराम टिपले नागपूर, डॉ निशिकांत टिपले नागपूर, दिपक टिपले, विष्णु टिपले चंद्रपूर, आशा देवी टिपले चंद्रपूर हे उपस्थित होते.
सुरुवातीला टिपले कुटुंबातील सर्व सहभागी सदस्यांचा परिचय करून देण्यात आला. त्यानंतर 75 वर्षावरील जेष्ठ सदस्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल व सन्मान चिन्ह देवून करण्यात आला.
अतिथी म्हणून प्रा, नैनंता टिपले नागपूर म्हणाल्या की आपल्या कडे नवीन आलेल्या सुना म्हणुन ज्या मुली येतात ती आपली मुलगी समजून सांभाळून घेतले पाहिजे, तिला योग्य ते मार्गदर्शन केले पाहिजे. प्रेम दिले पाहिजे. त्याच बरोबर सून म्हणून आलेल्या मुलीनी देखील सासू, सासरे, देर,ननद यांना आपल्या आई वडिलां प्रमाणे वागणूक दिली पाहिजे. सोबतच आपल्या ज्या मुली लग्न होऊन बाहेर जातात त्यांनी देखील सर्व कुटुंबातील लोकांना आपले समजून वागणूक दिली पाहिजे. आणि प्रेमाने राहिले पाहिजे. असे प्रा, नैनंता टिपले नागपूर यांनी आवाहन केले.अविनाश टिपले आपल्या भाषणात म्हणाले की आपण बौद्ध म्हणुन भारतीय समाजात वावरताना आपल्या हातून चुका होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. आणि बुद्ध तत्वज्ञान इतरही लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बौद्ध याचा अर्थ धम्म मार्गाने जाणारा होय. आपण बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या मार्गावर चालले पाहिजे असे जेष्ठ पत्रकार अविनाश टिपले यांनी सांगितले. विदर्भातील चंद्रपूर येथील हे तिसरे संमेलन असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थित मान्यवरांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रदीप टिपले यांनी केले तर संचालन पोर्णिमा टिपले यांनी केले.
चंद्रपूर जिल्ह्यातील टिपले परिवाराचे बौद्ध संमेलनयाचे भव्य आयोजन हे अविनाश टिपले, विष्णु टिपले, प्रदीप टिपले, दिपक टिपले यांनी केले होते. या परिवार संमेलनात नोकरीच्या निमित्ताने मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्र राज्यातील टिपले परिवारातील सदस्य सहभागी झाले होते. सर्व सहभागी झाल्याबद्दल सुधा विष्णु टिपले चंद्रपूर यांनी हार्दिक अभिनंदन करून आभार मानले.




