घुग्घुस येथील बांगडे परिवारातर्फे पाणपोई सुरु

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

घुग्घुस येथील बांगडे परिवारातर्फे गरजू नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जुना बसस्थानक परिसरात पाणपोई सुरु करण्यात आली आहे.
पाणपोईचे उदघाटन भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

या प्रसंगी बोलताना देवराव भोंगळे म्हणाले की यावर्षी उष्णता खूप जास्त आहे, बाजारात येणाऱ्या लोकांची संख्या खूप मोठी आहे. या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत होता. परंतु श्री. दिनेश बांगळे यांनी ही बाब लक्षात घेऊन पाणपोई उघडली आहे. अनेक नागरिकांना याचा फायदा होणार आहे. मी बांगळे परिवाराचे अभिनंदन करतो.

यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, दिनेश बांगडे, विनोद चौधरी, सुरेंद्र भोंगळे, सुशील डांगे, आकाश निब्रड, गणेश शेडके, भारत साळवे, सिनू कोत्तूर उपस्थित होते.

 

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED