नेत्ररुग्णांची बारावी तुकडी सेवाग्राम येथे रवाना

🔹सुधीरभाऊ लाखो रुग्णांचे दृष्टिदाता – विवेक बोढे

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.7मे):-आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र घुग्घुसतर्फे भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात व भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या मार्गदर्शनात भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांचा मुलगा चि. शौर्य बोढे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार ७ मे रोजी घुग्घुस परिसरातील जेष्ठ नागरिकांची तुकडी सेवाग्राम येथील कस्तुरबा गांधी रुग्णालयात मोतीबिंदूच्या उच्चस्तरीय तपासणी करिता एक तुकडी पाठविण्यात आली.

याप्रसंगी रुग्णांना चादर, पाणी बॉटल, पिशवी व मिठाईचे वाटप करण्यात आले.अनेक वर्षापासुन उच्चस्तरीय तपासणी करिता जेष्ठ नागरिकांची तुकडी सेवाग्राम येथील रुग्णालयात पाठविण्यात येत आहे.

मागील अनेक वर्षांपासून आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या माध्यमातून घुग्घुस परिसरातील गोर गरीब गरजू व जेष्ठ नागरिकांना आरोग्याच्या विविध सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे, रुग्णसेवेचे कार्य निरंतर पणे सुरु आहे. गरजू रुग्णाला आरोग्य विषयक मदत लागल्यास घुग्घुस येथील मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी केले आहे.

यावेळी भाजपा महामंत्री नामदेव डाहुले, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी पंस उपसभापती निरीक्षण तांड्रा, भाजपाचे सिनू इसारप, साजन गोहने, अमोल थेरे, श्रीकांत सावे, सुभाष मशाखेत्री, प्रयास सखी मंच अध्यक्ष किरण बोढे, शौर्य बोढे, सुनंदा लिहीतकर, लता आवारी, अजय लेंडे, उमेश दडमल, खुशबू मेश्राम,जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, लेख, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED