🔺एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे आवाहन

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.29जून): महाराष्ट्र शासनाचे आदिवासी विकास विभागाचे शासन निर्णय क्र. आदिशी-1203,प्र.क्र.76,का.12 दि.31मार्च 2005, 11 एप्रिल 2012 व दिनांक 16 मार्च 2016 अन्वये राज्यातील अनुसूचित जमातीच्या 10 विद्यार्थ्यांना परदेशात पदवी,पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणेसाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात परदेशात शिक्षण घेणेसाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीचा लाभ मिळणेसाठी दिनांक 5 जुलै 2020 पुर्वी अर्ज मागविण्यात येत आहे.

परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज जवळच्या एकलव्य रेसिडेन्शियल स्कुल व शासकीय आश्रमशाळा संलग्न कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये व प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर येथे उपलब्ध आहेत.अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर एन.व्हि. राठोड यांनी केले आहे.

आदिवासी विकास

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED