अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

91

🔹घटनेचा जाहीर निषेध करीत केली आरोपी नराधमास फाशीची शिक्षेची मागणी

✒️सिद्धार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

महागाव(दि.7मे):- यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्काार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करीत आरोपी नराधमास फाशीची शिक्षेची मागणी एका निवेदनाद्वारे बिरसा ब्रिगेड व महिला बिरसा ब्रिगेडचे वतीने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेकडे केली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या फुलसावंगी येथे अल्पवयीन पंधरा वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. त्यानंतर आरोपीने जीवे मारण्याची धमकी देऊन रिपोर्ट देऊ दिला नाही.

त्यामुळे दिनांक 9 एप्रिल 2022 रोजी घडलेल्या घटनेचा रिपोर्ट दिनांक 04.05.2022 रोजी दिल्यानंतर महागाव पोलिसांनी आरोपी संतोष शिंदे यांचे विरुद्ध अपराध क्रमांक 250/2022 अनुसार भादवि चे कलम 376, 354, ॲट्रॉसिटी व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले.

ठाणेदार विलास चव्हाण व बीट जमादार निलेश पेंढारकर यांनी आरोपीस त्वरीत जेरबंद करण्याची कामगीरी केली. अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेचा जाहीर निषेध करीत नराधमास कठोरात कठोर फाशीची शिक्षा व्हावी,या दृष्टीने आवश्यक तपास करावा.

तसेच पिडीत कुटुंब गरीब असल्याने शासनाकडून तातडीने आर्थिक मदत देण्याचे दृष्टीने उपाययोजना कराव्यात.

पीडित मुलीसह त्यांचे आई-वडील कुटुंब नातेवाईक यांचे आरोपी तथा आरोपीचे हस्तकापासून संरक्षण होण्याच्या दृष्टीने उपाययोजना करावी.

सदर प्रकरणात पीडितेला न्याय मिळण्याच्या दृष्टीने अंडरट्रायल प्रकरण चालवीत जलदगती न्यायालयामार्फत त्वरित न्याय देण्याच्या दृष्टीने उपाय योजना कराव्यात अशा मागणीचे निवेदन बिरसा ब्रिगेड चे विदर्भ अध्यक्ष पांडुरंग व्यवहारे, तालुकाध्यक्ष मारोती भस्मे व महिला ब्रिगेडच्या तालुका अध्यक्ष सौ सुनीताताई मळघणे यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी यवतमाळ व नांदेड तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ व नांदेड यांच्यासह उप विभागीय पोलिस अधिकारी, उमरखेड यांना उपविभागीय अधिकारी पुसद यांच्यामार्फत देण्यात आले.

या निवेदनावर पांडुरंग व्यवहारे, मारोती भस्मे, सुनीताताई मळघणे, गजानन भोगे, भाऊराव बेले, सुरज हाडसे, आतिष वाघमारे, सुखदेव आसोले, संतोष अंभोरे, रहेमान चव्हाण, विट्ठल मिरासे, गोपाल मारकड, शरद ढेबरे, सकिब शाह, पंकज वंजारे, फिरोज खान, सोहेल चव्हाण, अक्षय व्यवहारे, सो शांता बेले, सौ सुनिता धनवे, सुनिता रिठे, चंदा तडसे, अविनाश तडसे, पांडुरंग मळघणे यांच्यासह अनेक सामाजिक संघटनाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या सह्या होत्या.