स्वच्छतेच्या नावावर वार्ड क्रमांक B/7 मध्ये प्रत्येकी रुग्णांकडुन पन्नास रुपयांची लुट-धक्कादायक प्रकार प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने उघड

🔸दरमहा रुग्णालयातील स्वच्छतेसाठी लाखों रुपये खर्च करुन ही रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो- अशोक गंडले

✒️अंबाजोगाई प्रतिनिधी(शेख फेरोज)मो:-7020475287

अंबेजोगाई(दि.8मे):-आशिया खंडातील सर्वात मोठे ग्रामीण रुग्णालय म्हणजे अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय ग्रामीण रुग्णालय होय आज दिनांक 8 में रोजी रुग्णालयातील बी इमारत सर्जिकल विभागातील वार्ड क्रमांक B/7 मधील धक्कादायक प्रकार समोर आला आहे.येथील वार्ड मधील कर्मचारी स्वच्छतेसाठी प्रत्येकी रुग्णांकडुन पन्नास रुपये घेत असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाच्या शहर अध्यक्ष अशोक गंडले यांच्या निदर्शनास येताच रुग्णालयातील अधिष्ठाता आणि रुग्णालयातील आर एम ओ यांना कळविले असता ताबडतोब रक्कम रुग्णांना परत करण्यात आले.परंतु रुग्णांच्या सुख सुविधा न देताच रक्कमेची मागणी करण्यात येत असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे.मात्र रुग्णांच्या अवस्थेचा फायदा घेत त्यांच्याकडुन रक्कमेची मागणी केली जात आहे.

शासकिय रूग्णालयात येणारा रुग्ण मोलमजुरी करुन जगणारा कामगार,शेतकरी व मजुर वर्गही आहे खाजगी रुग्णालयात जाऊन उपचार घेता येत नाही म्हणुन शासकिय रुग्णालयात रुग्ण उपचारासाठी येतात यामागे चार पैशाची बचत व्हावी शिल्लक राहावे अशी अपेक्षा असते परंतु शासकिय रुग्णालयात अशी लुट सुरु असल्याने रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे
शासनातर्फे रुग्णालयातील स्वच्छतेसाठी विविध सुविधा,पाणी, साहित्यासाठी कोटी रुपये खर्च करुन पुरविण्यात येत आहेत परंतु रुग्णालयातील स्वच्छतेचे गुत्तेदार हे योजनांची अंमलबजावणी करणारे अधिकारी, कर्मचारी स्वार्थापोटी सामान्य माणसांवर याचा भुर्दंड बसविल्या जात असल्याचे चित्र समोरचं आहे
स्वामी रामानंद तीर्थ शासकीय ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी रुग्णांकडुन रुपयांची सक्ती करीत असल्याचा धक्कादायक प्रकार सतत रुग्णालयांत घडत आहे मात्र अनेक वेळा तक्रारी करुनही प्रशासनाने या प्रकाराकडे कानाडोळा केल्याने कर्मचाऱ्यांची लुट सुरुच असल्याचे रुग्णांमध्ये नाराजीचा सुर आहे

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED