🔸विद्युत उपकरणे हाताळतांना काळजी घेण्याचे आवाहन🔸

16

🔺राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताह प्रारंभ

🔸जिवंत विद्दुत तारेचे कुंपण करू नये

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर,दि.29 जून: केंद्र शासनाचे या वर्षी दि. 26 जून 2020 पासून प्रथम राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताह आयोजित करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार जनतेला विद्युत उपकरणे हाताळणी करतांना तसेच पावसाच्या दिवसात काळजी घेण्याचे आवाहन विद्युत निरीक्षक उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग यांनी केले आहे.

अशी घ्यावी काळजी:

घरातील विद्युत उपकरणे तसेच वायरींगची देखभाल दुरुस्ती ही मान्यताप्राप्त अनुज्ञाप्ती धारक विद्युत ठेकेदार यांचे कडुन करुन घेण्यात यावी. घरातील बटने, स्विच यांना ओल्या हातानो स्पर्श करू नये. घरातील विज संचमांडणीस 30 मिली अम्प संवेदनशिलता असलेले आरसीसीबी बसविण्यात यावे,जेणे करून कुठल्याही घरगुती विद्युत अपघाता पासून बचाव होईल.

पावसाळ्यात विजपोल तसेच उपकरणे यास आलेल्या ओलाव्यामुळे लिकेज करंट येण्याची शक्यता असल्याने कुठल्याही विज पोलला व इतर विजे संबंधीत उपकरणांना हात लाऊ नये.वारा वादळामुळे विजेचे तार तुटुन जमिनीवर पडून आढळल्यास सर्व प्रथम सदर माहिती विज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना द्यावी जेणेकरुन अपघात टाळता येईल.

विजेच्या पोलला अथवा तणावास जनावरे बांधु नये. विजवाहिनीखाली अथवा विजवाहिनी पासुन सुरक्षीत अंतर नसल्यास घराचे बांधकाम करु नये. जिवंत विद्युत तारेचे कुंपन शेता भोवती करु नये.