सर्व जाती धर्माच्या बेईमान महिला……?

सर्व जाती धर्माच्या महिलांना सर्व धर्मानी गुलाम करून ठेवले होते. महिलांचे नशीब की भारतात महात्मा जोतिबा फुले जन्माला आले. जोतिबा जन्माला आले. त्यांनी सावित्रीमाई यांना शिकवले आणि शिक्षिका केले. त्यांना साथ दिली फातिमा माई यांनी.मुस्लिम धार्मियांनी बाईला बुरख्यात, ब्राह्मणी धर्माने घुंघट मध्ये. त्यांनी तर सती प्रथेत बाईला जिवंत जाळले. विधवा बाईचे केशवपण केले. त्यांना अंधाऱ्या खोलीत बंद करून तिचे शोषण केले. ती प्रेग्नेंट राहिल्यावर तीला विहिरीत जिवंत फेकून ठार केले.कोणत्याही धर्माची स्थापना महिलांनी केली नाही. सर्व धर्म पुरुष सत्ताक निर्मित आहेत.महिलांना गुलाम करणारे.अशा वेळी महात्मा जोतिबा फुले जन्माला आले.आणि कर्म धर्म संयोगाने इंग्रजांचे राज्य होते.त्यांनी राजाराम मोहनरॉय यांना धरून सतीची चालं बंद केली.फुलेनी शाळा उघडल्या, विधवा महिलांचे बाळंत पण केले.त्यांना शिक्षण दिले.असे असताना समस्त महिला जातींना महात्मा -सावित्रीमाई फुले कोण हे माहिती नाही. ब्राम्हण महिला शिकून मोठ्या झाल्या आणि फुले दपत्यांशी बेईमान……

महिला मंदिर मस्जित गुरुद्वारात जातात चर्च मध्ये जातात पण त्यांना फुले सावित्री आठवतं नाही..???त्यांना धर्माचे देव दिसतात पण ज्या महिलांना जीवदान मिळाले शिक्षण मिळाले. महिला मोठ्या हुद्यावर गेल्या पण त्यांना महात्मा जोतिबा आणि सावित्री माई दिसत नाही….. ..हीच महिलांची बेईमानी आहे.महिला गुलाम होत्या. सती जात होत्या, जिवंत जाळल्या जात होत्या तेव्हा कुठे होते धर्म आणि त्यांचे देव आणि धर्माचे ठेकेदार????एकदा मुस्लिम मोहल्यात मुलाखतीसाठी गेलो तर एक महिला म्हणते महिला सोन आहेत. ते सोन झाकून ठेवले पाहिजे……ऐका शाळेत कार्यक्रमाला गेलो. तर तर त्या ठिकाणी सावित्रीमाई जयंतीला सरस्वतीची पूजा सुरु होती. मी म्हणालो हे काय? सावित्रीमाई फुलेंचा फोटो कुठे आहे? ते म्हणाले सरस्वती होती म्हणून सावित्री होती….काय म्हणावे या शिक्षक महिलांना आणि त्याशिक्षकांना???महिला डॉक्टर,इंजिनियर,आर्किटेक,वकील,सीए, झाल्या पण त्यांना ते कोणामुळे झाल्या हेच माहिती नाही.कारण….
धर्माने भेजा खाली केला.

जय सावित्रीमाई… जय जोतिबा

✒️पत्रकार बाबा रामटेके(कल्याण जिल्हा ठाणे)Mo. 8097540506

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED