मोर्शी वरुड तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत १ कोटी रुपयांचा निधी मंजूर !

🔹सामाजिक विकास योजनेतून होणार गावांचा विकास — आमदार देवेंद्र भुयार

✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मोर्शी(दि.8मे):-मोर्शी वरुड तालुक्यातील नागरी व ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांचा गावांचा विकास करण्यासाठी मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे सुचविलेल्या कामांना “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने” अंतर्गत सण २०२१ – २२ या वर्षासाठी मोर्शी वरुड तालुक्यातील विकास कामांना शासनस्तरावरून प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याची मागणी करण्यात आली होती. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आमदार देवेंद्र भुयार यांच्या मागणीची दखल घेऊन सदर योजनेमध्ये घ्यावयाच्या कामांमध्ये वाढ करुन त्यामध्ये मोर्शी वरुड तालुक्यातील हिवरखेड येथे अभ्यासिका तयार करण्यासाठी साहित्य खरेदी करणे करीता २० लक्ष रुपये, रस्ता बांधकाम, सामाजिक सभागृह, मोऱ्यांचे बांधकाम , चौक सौंदर्रीकरण, स्मशानभूमी दुरुस्ती करने करीता १५ लक्ष रुपये, रिद्धपुर येथे अभ्यासिका तयार करण्यासाठी साहित्य खरेदी करणे करीता ५ लक्ष रुपये, रस्ता बांधकाम, सामाजिक सभागृह, मोऱ्यांचे बांधकाम , चौक सौंदर्रीकरण, स्मशानभूमी दुरुस्ती करने करीता १० लक्ष रुपये, अंबाडा येथे रस्ता बांधकाम, सामाजिक सभागृह, मोऱ्यांचे बांधकाम , चौक सौंदर्रीकरण, स्मशानभूमी दुरुस्ती करने करीता १० लक्ष रुपये, अभ्यासिका तयार करण्यासाठी साहित्य खरेदी करणे ५ लक्ष रुपये, लोणी येथे अभ्यासिका तयार करण्यासाठी संगणक, फर्निचर साहित्य खरेदी करणे करीता ५ लक्ष रुपये, बेनोडा येथे रस्ता बांधकाम, सामाजिक सभागृह, मोऱ्यांचे बांधकाम , चौक सौंदर्रीकरण, स्मशानभूमी दुरुस्ती करने करीता १० लक्ष रुपये, अभ्यासिका तयार करण्यासाठी साहित्य खरेदी करणे करीता ५ लक्ष रुपये, जरूड येथे येथे रस्ता बांधकाम, सामाजिक सभागृह, मोऱ्यांचे बांधकाम , चौक सौंदर्रीकरण, स्मशानभूमी दुरुस्ती करने करीता १० लक्ष रुपये, अभ्यासिका तयार करण्यासाठी साहित्य खरेदी करणे करीता ५ लक्ष रुपये, मंजूर करण्यात आले असून या सहा गावातील विविध कामे पूर्ण करण्यासाठी १ कोटी रुपयांच्या विकास कामांना ३१ मार्च रोजी मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.

मोर्शी वरुड तालुक्यात नागरी व ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांमध्ये मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत” सन २०२१-२२ या वर्षासाठी असलेल्या अर्थसंकल्पीत तरतुदीतून ३१ मार्च रोजी निघालेल्या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट “अ” मधील रिद्धपुर, अंबाडा, हिवरखेड, लोणी, बेनोडा जरूड
येथील कामांना १ कोटी रुपयांच्या निधीला शासनाने मंजुरी दिली असून सामाजिक विकास योजनेतून गावांचा विकास होणार असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितले.

अनेक वर्षापासुन या भागातील मागासवर्गीय दलीत वस्तीचा विकास खुंडलेला होता. महाविकास आघाडीचे सरकार येताच विकास कामांचा धडाका सुरु झाला आहे. मतदार संघातील विविध विकास कामांसाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असून मतदार संघातील सर्वसामान्य जनतेशी निगडीत प्रश्नांच्या विकास कामांना सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे — आमदार देवेंद्र भुयार

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED