तुमचे डेसीबल…!!

मस्त आहे बुवा तुमचे

कानही मस्तच की,

जाहीर सभेतला आवाज भोंग्याचा

गोंगाट लोकांचा..

डेसीबल मर्यादा तेव्हाच ओलांडतो

जेव्हा नेता माईक हातात घेतो…

काळजी डेसीबलची होतीच तर

मेसेज करून प्रचार करायचा होता…

स्वागत- सत्कार न बोलताच करा..

कानात बोलून हळूच,

आले तसे गुपचूप जा!

डेसीबलची मर्यादा आधी तुम्ही पाळा..!

लोकांची काळजी नाटक वाटते,

जेव्हा तुम्ही 100 डेसीबलमध्ये ओरडत असता

आमचेही कान दुखतात

मतदार असून फायदा कोणता…

कळतच नाही हो..

डेसीबलची भानगड नेमकी कोणासाठी करता…

तुम्ही या; बोंबला; आरडा-ओरडा करा..!

डेसीबलला पाहून घेऊ आम्ही

आमच्यासाठी झगडणे तुम्ही सोडा

उपकार बस एवढेच करा!!

✒️अमोल चंद्रशेखर भारती(नांदेड)

नांदेड, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED