पिंपळगाव बसवंत शहरात मराठा वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन

100

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.9मे):-आजच्या धकाधकीच्या जीवनात सकल मराठा समाजातील उपवर मुला मुलींच्या विवाह जुळविण्यासाठी प्राथमिक परिचयाची आणि संवादाची नितांत आवश्यकता आहे. सध्याच्या काळात व्हाट्सअप ग्रुप वर फक्त बायोडाटा टाकून तो बायोडाटा सर्व पाहतील असे नाही, त्यासाठी नाशिक जिल्ह्य़ातील पिंपळगाव बसवंत ता. निफाड शहरात सकल मराठा सोयरीक ग्रुप च्या ९ व्या वर्धापनदिनानिमित्त सकल मराठा सोयरीक ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमाने पिंपळगाव बसवंत येथे रविवार दि.१५ मे २०२२ रोजी सकाळी १० वा. पृथ्वी मंगल कार्यालय, रंगत हाॅटेल शेजारी मुंबई-आग्रा हायवे रस्ता, पाचोरेवणी फाटा. पिंपळगाव बसवंत ता.निफाड जि.नाशिक येथे सकल मराठा वधू-वर थेट-भेट परीचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सकल मराठा सोयरीक ग्रुपचे राज्याध्यक्षा सौ. संगीताताई गोंदकर व सोयरीक ग्रृपचे समन्वयक श्री.जयकिसन वाघ पाटील यांनी दिली.

या मेळाव्यात समाजातील सर्व विवाहयोग्य मुलं आणि मुली तसेच पालक यांनी कुठलाही संकोच मनात न ठेवता उपस्थित राहायचे आहे, जेणेकरून समाजबांधवांना सोबत आणि योग्य त्या व्यक्तीसोबत विवाह संबंधी संवाद साधू शकतो. आपले मूळ गाव सोडून नोकरी- व्यवसायानिमित्त शहरात वास्तव्यासाठी असणाऱ्या मंडळींनी सुद्धा आवर्जून उपस्थित राहायचे आहे कारण या कार्यक्रमाला शहरी आणि ग्रामीण भागातील आपले सर्व नातेवाईक, राहुरी, नेवासा, संगमनेर, अकोला, राहाता, वैजापूर, येवला,नगर चांदवड, दिंडोरी इतर तालुक्यातील व परिसरातील, जिल्ह्यातील अनेक उच्चशिक्षित, शिक्षित, व्यवसायिक, उद्योजक वधू-वर आवर्जून उपस्थित राहणार आहेत विवाहयोग्य वर-वधू आणि पालक यांनी आपले माहिती पत्र बायोडाटा किमान पाच झेरॉक्स एक पासपोर्ट फोटो व आधार कार्ड झेरॉक्स मेळाव्यात घेऊन येणे अवश्यक असून मेळाव्याच्या अगोदरच्या दिवशी नोंदणी केली तर नियोजन करायला सोयीचे होईल किंवा कार्यक्रमाच्या दिवशी मेळाव्यात नोंदणी करता येईल नंतर सुद्धा नोंदणी चालूच राहील. मेळाव्यात सर्व पालकांनी आपल्या मुलींना आणण्यास कुठलाही संकोच बाळगू नये कारण परिचय मेळाव्यात फक्त सकल मराठा समाज सहभागी राहील इतर कुठलीही व्यक्ती कार्यक्रमाला नसेल किंवा इतर दुसरा कुठलाही कार्यक्रम नसेल फक्त राजमाता ,राष्ट्रमाता जिजाऊ माॅ.साहेब यांचे पूजन वगळता अन्य कोणाताही कार्यक्रम नसेल या कार्यक्रमाला उपस्थित सर्व आपलेच सगेसोयरे असल्यामुळे मुलांना विशेषतः मुलींना येण्यास काही हरकत नाही.

सदर मेळाव्याचे आयोजन करणे म्हणजे आपण समाजाचे काही देणे लागतो आणि या निमित्ताने समाज संघटित होण्यासाठी मदत होते या उदात्त हेतुने नाशिक जिल्ह्यातील सर्व थोरामोठ्यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने परिचय मेळावा आयोजित केलेला आहे. कृपया सर्वांनी मिळून मिसळून कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्‍यासाठी सहकार्य करा ही आपल्या मराठा समाजाला वधू-वर पालक परिचय मेळावा समितीच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे या वधू-वर थेट-भेट परीचय मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तालुक्याचे आमदार दिलीपरावजी बनकर ,बाळासाहेब घोरपडे, पुथ्वी मंगल कार्यालयाचे तानाजीराव बनकर यांच्या हस्ते वधू-वर मेळाव्याचे उद्घाटन करण्यात येईल, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रल्हाद दादा गडाख संचालक मराठा विद्याप्रसारक समाज उपस्थित राहणार असून या मेळाव्यात संबंधित संपर्क साधण्यासाठी मोबाईल नंबर ९१३०९५०९९९ साधावा असे आवाहन सकल मराठा सोयरीक ग्रुपचे राज्य निरीक्षक अनिल गडाख, प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदिप शिंदे, रघुनाथ झावरे, लक्ष्मण मडके,हरीभाऊ जगताप, गणेश सावंत, अर्जुन ताक्टे, मुकुंद चव्हाणके,महेश पानगव्हाणे,या डाॅ.नितिन धारकर, सोपानराव खालकर, बाळासाहेब पाटील, विठ्ठलराव उगले,अँड त्रिंबक गडाख, राजेंद्र टोकळे पाटील, प्रा.रामचंद्र राऊत, अनिल म्हसे, अच्युत गाडे, धनंजय सांबारे, वसंतराव मुठे, राजेश सरमाने, विनोद वाडेकर, सौ.अनिषा गडाख, सौ.मायाताई जगताप सौ.संपदा दिवटे, शिवाजी कमाणकर यांनी केले आहे.