वरुड तालुक्यातील अल्पसंख्यांक वस्तीच्या मुलभूत सुविधांसाठी १ कोटी रुपयांचा निधी !

68

🔸आमदार देवेंद्र भुयार यांच्या विशेष प्रयत्नामुळे निधी मंजूर !

✒️वरुड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

वरुड(दि.9मे):- तालुक्यातील अल्पसंख्यांक वस्तीत पायाभूत मुलभूत सुविधांसाठी निधी देण्यात यावा अशी मुस्लिम समाजातील नागरिकांच्या बऱ्याच दिवसांपासून मागणी होती. या मागणीचा विचार करून वरुड तालुक्यामध्ये १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार देवेंद्र भुयार यांनी दिली.राज्यातील अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्रात मूलभूत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हे अनुदान देण्यात येत आहे. यामध्ये अल्पसंख्यांक वस्तीमध्ये रस्ते करणे, ईदगाह मैदान करिता संरक्षक भिंत बांधणे, सभामंडप, शादीखाना बांधणी, कब्रस्तान सुशोभीकरण करणे आदी कामे करण्यात येणार आहे.

वरुड तालुक्यातील आमनेर येथे मुस्लिम कब्रस्थानास संरक्षक कुंपण बांधकाम करणे २० लक्ष,वाघाळ येथे मुस्लिम कब्रस्थानास संरक्षक कुंपण चैन लिंक फेन्सिंग बांधकाम करणे १५ लक्ष, गव्हानकुंड येथे कब्रस्थान तथा ईदगाह येथे संरक्षक कुंपण चैन लिंक फेन्सिंग बांधकाम करणे १५ लक्ष, बेनोडा येथे मुस्लिम कब्रस्थानास संरक्षक कुंपण चैन लिंक फेन्सिंग बांधकाम करणे १५ लक्ष रुपये , सवंगा येथे मुस्लिम कब्रस्थानास संरक्षक कुंपण चैन लिंक फेन्सिंग बांधकाम करणे १० लक्ष, लोणी येथे मुस्लिम कब्रस्थानास संरक्षक कुंपण चैन लिंक फेन्सिंग बांधकाम करणे १५ लक्ष, पुसला येथे मुस्लिम कब्रस्थानास संरक्षक कुंपण चैन लिंक फेन्सिंग बांधकाम करणे १० लक्ष या विकास कामांकरीता १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

सर्व जाती धर्म पंथ आणि पक्षाचे सर्व बंधन तोडून माणूस माझी जात आणि जनताच माझा धर्म हे ब्रीद डोळ्यासमोर ठेवून मी माझं काम प्रामाणिक पणे करत आहे, मतदारसंघातील जनता उघड्या डोळ्यांनी विकास काय असतो ते पाहत आहे आज मंजूर केलेली कोट्यावधी रुपयांची विकास कामे ते काम पूर्ण झाल्यानंतर नावरूपास येईल. सत्तेचा उपयोग मतदार संघातील लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी कसा करायचा याची मला परिपूर्ण जाणीव आहे कारण मी शाखा प्रमुखा पासून तयार झालेला कार्यकर्ता आहे मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलविण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. — आमदार देवेंद्र भुयार