🔺गोंडपिपरी येथे भाजपा चे वीजबिल व कर्ज माफ विरोधात उपोषण🔺

9

🔹तीन महिन्याचे वीजबिल सरसकट माफ करावे.

🔸शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करावे.

✒️नितीन रामटेके(गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी)
मो:-8698648634

गोंडपिपरी(29जून) :- कोरोणाच्या संकटकाळात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून तीन महिन्याचे अवाढव्य वीजबिल आले आहे. या संकट काळातील वीजबिल पूर्णतः माफ करण्यात यावे, यासाठी गोंडपिपरी तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आज 29 रोजी आमरण उपोषण करण्यात आले. या उपोषणाला राजुरा विधानसभाचे माजी आमदार संजयजी धोटे, गोंडपिपरी तालुका अध्यक्ष बबन निकोडे, राकेश भाऊ पुन भाजपा तालुका युवा अध्यक्ष गोंडपिपरी, सुनीता येग्गेवार सभापती पं. स. गोंदपिपरी, अरुण कोडपे उपसभापती पं. स. गोंडपिपरी, अश्विन कुसनाके, वैष्णवी बोडलावार जि. प.सदस्या चंद्रपूर, कल्पना अवथरे जि. प.सदस्या चंद्रपूर, मनीष वासमवार पं. स. गोंडपिपरी, अमर भाऊ बोडलावार, निलेश संगमवार व इतर भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
सध्या कोरोनाचा कहर संपूर्ण जगामध्ये सुरू आहे. मागील तीन महिन्यांपासून देशामध्ये लॉकडाऊन लागू केले आहे. अश्यात लोकांना रोजगारापासुन वंचित राहावे लागले. आज लोकांना खाण्यापिण्याची सोय करण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. अश्यात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कडून तीन महिन्याचे भयंकर वीजबिल आले. त्यामुळे सरकारने याची दक्षता घेऊन पूर्णपणे सरसकट तीन महिन्याचे वीजबिल माफ करावे. तसेच सरकारने केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्याची फसवणूक असून सरकारने ही कर्ज माफी सरसकट द्यावी. अशी मागणी भाजपचे माजी आमदार संजयजी धोटे व भाजपा कार्यकर्ते यांनी केले आहे.